`या` गोष्टींना घाबरणारे लोक 100% प्रयत्न करुन अयशस्वीच ; चाणक्य नीतिचा घ्या सल्ला
अनेकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही यश काही आपल्या पदरात येत नाही. असा अनेकांना अनुभव असेल. याला कारणीभूत असते तुमची भीती. आचार्य चाणक्य यांनी आपल्या `चाणक्य नीति` मध्ये दिलाय अशा लोकांना खास सल्ला.
आचार्य चाणक्य कायमच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत असतात. मग ते मार्गदर्शन खासगी जीवन असो किंवा समाजात कसं वावरायचं? यावर मार्गदर्शन असो. अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी यश काही हाती लागत नाही. अशावेळी माणसामध्ये भीतीची भावना निर्माण होते. ही भावना तुमच्या यशा आड येते. अशावेळी आचार्य चाणक्य सांगतात की, तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. याला कारणीभूत आहे तुमचा एक स्वभाव.
आजही अनेकांना चाणक्य नीती शिकायला आवडते. म्हणूनच हे आजही लोकप्रिय धोरणांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत चाणक्यांनी कोणत्या लोकांना डरपोक म्हटले आहे ते जाणून घेऊया.
यश दूर पळतं; कारण...
चाणक्य म्हणतात की, बदल हा जीवनाचा नियम आहे. अशा परिस्थितीत, आपण कधीही बदलाला घाबरू नये, कारण बदलामुळे आपल्या जीवनात नवीन संधी आणि अनुभव येतात. त्यामुळे ते नेहमी सकारात्मक स्वरूपात स्वीकारले पाहिजे. चाणक्यच्या मते, जो व्यक्ती बदलाला घाबरतो तो आयुष्यात कधीही आपले ध्येय साध्य करू शकत नाही.
बदलाप्रमाणेच संघर्षाला कधीही घाबरू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की, केवळ संघर्षामुळेच माणसाला त्याच्या क्षमता ओळखण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जीवनातील संघर्षांना घाबरणारी व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. अनेकदा लोकं बदलाला किंवा संघर्ष करायला घाबरतात. हा संघर्ष किंवा बदल तुमच्या यशाला कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे कधीही नवीन गोष्टींना आनंदाने सामोरे जा.
अशा लोकांना म्हटले भ्याड
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात फक्त अशाच लोकांना भ्याड म्हणून वर्गीकृत केले आहे. जे जीवनात येणाऱ्या बदलांना आणि संघर्षांना घाबरतात. कारण असे लोक आयुष्यात कधीच यश मिळवू शकत नाहीत. त्यामुळे माणसाने या दोन गोष्टींना कधीही घाबरू नये आणि ध्येय गाठण्यासाठी या आव्हानांना धैर्याने सामोरे जावे. तरच यशाची शिडी चढता येईल.