`रोज जेवायला काय करु?` या प्रश्नाला कंटाळून त्याने घेतला मोठा निर्णय; 15 वर्षांपासून...
Viral Lifestyle News: तुमच्या घरामध्येही रोज उद्या जेवायला काय करायचं किंवा उद्या भाजी कोणती करायची यावर जोरदार चर्चा होत असावी. मात्र या प्रश्नाला एका व्यक्तीने कायमचा जालीम उपाय शोधला आहे.
Viral Lifestyle News: 'उद्या जेवायला काय करायचं?' किंवा 'उद्या काय भाजी करायची?' हा प्रश्न प्रत्येक घरात चर्चेचा विषय असतो. यानंतर मग फ्रिजमध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत, कोणती भाजी कधी खाल्ली होती? वगैरे वगैरे चर्चा होतात. तुम्ही सुद्धा हे नक्कीच अनुभवलं असेल. मात्र रोज जेवायचा काय कराचं या प्रश्नाचा सामना आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी करावा लागतो. मात्र यावर एका जपानी व्यक्तीने अगदीच जालीम उपाय शोधून काढला आहे.
नेमका काय निर्णय घेतला या माणसाने?
जापानमधील या व्यक्तीने दिवसभरातील महत्त्वाचा वेळ काय जेवायला करायचं यावर चर्चा करण्यामध्ये वाया जाऊ नये म्हणून कठोर निश्णय घेतला आहे. गो किता असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मागील 15 वर्षांपासून किता यांनी 'डिसिझन-फ्री लाइफस्टाइल' म्हणजेच निर्णय घेण्याची वेळच येऊ नये असं आयुष्य जगण्यास प्राधान्य दिलं आहे. जपानमधील टीबीएस टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे किता हे माहिती क्षेत्रात कार्यरत आहेत. 15 वर्षांपूर्वी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा निर्णय घेण्यासंदर्भातील प्रकरणांमुळेच मानसिक तणाव वाढतो असं किता यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच खासगी आयुष्यात निर्णय घ्यावे लागणारे विषय कायमचे मार्गी लावण्याचं किता यांनी ठरवलं. आपला वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी किता यांनी आपली लाइफस्टाइल बदलली. ते मागील 15 वर्षांपासून रोज एकच पदार्थ खातात. त्यामुळे रोज काय जेवायला करायचं? काय भाजी करायची असा प्रश्न आणि त्यासंदर्भातील चर्चा करण्याचा वेळच किता यांच्यावर येत नाही.
हा माणूस खातो तरी काय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मागील 15 वर्षांपासून हा माणूस खातो तरी काय? साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, सकाळी ब्रेकफास्टमध्ये किता दाणे आणि रेमन (एक प्रकारचे न्यूडल्स) खातात. लंचमध्ये किता चिकन खातात तर रात्रीच्या जेवणामध्ये तळलेलं पोर्क आणि कडधान्य असा आहार घेतात. मागील 15 वर्षांपासून किता या पाचच गोष्टी खातात. आहाराचं संतुलन राखण्यासाठी ते नियमितपणे औषधाच्या काही गोळ्याही खातात.
सेम रंगाची अंडरपॅण्ट वापरतो
आपल्या या निर्णयामुळे किता यांचा जेवण करण्याचा आणि जेवायला काय करु हे ठरवण्याचा वेळ तर वाचतो. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी एकाच पद्धतीचे शर्ट आणि ट्राऊजर रोज परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडील सॉक्स आणि अंडरपॅण्ट्सचा रंगही एकच आहे. किता यांनी एवढं नियोजन केलं आहे की नखं कधी कापायची, दाढी कधी करायची आणि कपडे कधी किती धुवायचं याचेही वेळापत्रक त्यांनी तयार केलं आहे. या निर्णयांमुळे आपल्याला नक्कीच मानसिक शांतता मिळत आहे, असं सांगितलं आहे.