Train Worst Seat : ट्रेनमध्ये प्रवास सुखकर व्हावा यासाठी योग्य पर्याय म्हणजे एसी कोच. त्यासाठीच लोकं हे रिजर्वेशन करताना एसी कोचची निवड करतात. रिजर्वेशन केलं असलं तरी देखील तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागला असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा एसी कोचमध्ये देखील सामना करावा लागू शकतो. त्याचं एक उदाहरण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचा रेल्वेतील प्रवास आठवेल तर अनेकांना त्या प्रवाशांची दया येईल. याशिवाय अनेक लोक आता हा व्हिडीओ पाहून बोलू शकतात की त्यांना हा बर्थ कधीच मिळू नये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनममध्ये प्रवास करताना जर तुम्हाला लोअर बर्थ मिळाला तर तुमचा प्रवास हा सुखकरत ठरतो. कारण लोअर बर्थ असणाऱ्या व्यक्तीला ना मिडल बर्थ उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी कोणाची प्रतीक्षा करावी लागते. ना त्यांना अप्पर बर्थ चढण्याचे कष्ट घ्यावे लागता. खरा त्रास तर त्या व्यक्तीला होतो जो साइड बर्थवर असलेल्या व्यक्तीला आणि ते पण वरच्या बर्थवर त्यातही ट्रेनच्या गेटच्या जवळची, मग कोणतीही व्यक्ती जेव्हा ट्रेनमध्ये चढते आणि उतरते तेव्हा त्या व्यक्तीला हा त्रास होतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं आहे. जो ट्रेनमधील एसी कोचनं प्रवास करत होता आणि त्याला साईड बर्थ अप्पर सीट मिळाली होती. त्यामुळे ती व्यक्ती संपूर्ण प्रवासात झोपलाच नाही. कारण त्या गेटमधून सतत इतर प्रवाशांचं येणं जाणं सुरु होतं. कधी कोणी वॉशरुमला जात होतं तर कधी कोणता प्रवासी येत होता. तर कधी कोणता टिसी येतोय. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दरवाजा उघड बंद होतो तेव्हा खूप मोठ्यानं आवाज येतो. त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीचे डोळे हे डचकून उघडतात. 


हेही वाचा : 'पुष्पा 2: द रुल' मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL


व्हायरल व्हिडीओमध्ये या प्रवाशानं त्याचा अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 12.8 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की रात्रभर झोपू दिलं नाही. व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तर काही नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'फक्त विचार करा की हा एसी नसलेला कम्पार्टमेंट असता तर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू तुझं डोकं दुसरीकडे करून झोपायला हवं होतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुझं दु:ख मी समजू शकतो.'