पहिल्या विमान प्रवासात हमखास होतात `या` चुका, तुम्ही आत्ताच द्या लक्ष
विमानाने प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. सगळ्यात आरामदायी आणि कमी वेळात लवकर पोहोचवणारा प्रवास म्हणजे विमान प्रवास आहे. विमानाने प्रवास करताना सुरक्षा रक्षकांकडून तुमच्या सामानाची देखील तपासणी केली जाते.त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या चुका करणं टाळा.
सोशल मीडियाच्या वापराने जगात कुठे काय सुरु आहे हे लगेच समजतं. विमानाने प्रवास करताना खूपवेळा प्रवाशांकडून गैरवर्तन गैरवर्तन केल्याचे व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामुळे या सगळ्यात विमान कंपन्या आणि विशेषत: देशाचं नाव देखील खराब होतं. यासाठीच आता विमानाने प्रवास करताना प्रवाशांना नियम आखून देण्यात आले आहेत. जर नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला तुरुंगवास आणि दंड भरण्याची शिक्षा सुनावली जाते. काय आहेत नक्की हे नियम चला तर मग जाणून घेऊयात.
ज्वलनशील पदार्थ
विमान प्रवास हा सर्वात महागडा मानला जातो त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही विमान कंपन्यावर असते. विमान प्रवासात सामानात लायटर, फटाके, दारुगोळा, प्लॅस्टिक विस्फोटक असे ज्वलनशील घटक नेणं टाळावं. धुम्रपान केल्याने तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. विमानात सिगारेट ओढणं हा गुन्हा समजला जातो, सिगारेटमुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार असाल तर धुम्रपान करणं टाळा.
लोखंडी सामान
मेटलच्या वस्तू, हत्यारं, मार्शल आर्ट, नाइट स्टिक्स, पेपर स्प्रे, स्टन गन थ्रोविंग स्टार या वस्तू विमान प्रवासात सोबत नेणं गुन्हा मानला जातो. बऱ्याचदा विमान हायजॅकचं होऊ नये यासाठी प्रत्येक देशातीस विमान कंपन्या या सुरक्षेची काळजी घेतात. त्यामुळे प्रवासा दरम्यान सुरक्षा सरक्षांकडून सामानाची चेकींग केली जाते. त्याचबरोबर जड वस्तू जसं की, खेळाचे सामान क्रिकेट बॅग, गोल्फ क्लब, हॉकी स्टिक, लैक्रोस स्टिक्स, पूल क्यू, स्की पोल्स, स्पियर गंस, हॉकी स्टिक, लैक्रोस स्टिक्स यासारख्या वस्तू सोबत प्रवासात नेल्यास तुम्हाला अडवण्यात येते. विमानाचा प्रवास हा राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असल्याने विमान तळावर करडी सुरक्षा राखली जाते. आकाशातून करण्यात येणारा हा प्रवास तितकाच संवेदनशील देखील आहे. त्यामुळे विमानातून फिरायला जाताना या काही नियमांचं पालन केल्यास तुमचा विमान प्रवास हा आनंददायी आणि सुखकर होईल.