Benefits of Being Single Woman News in Marathi : सध्या परिस्थिती अशी आहे की, मुलगा किंवा मुलगी लग्नाचे वय झाले तरी देखील लग्नाला तयार होत नाही. यामुळे अनेक कुटुंबे अशी आहेत ज्यांचे पालक नाराज आहेत. त्यांना त्यांच्या मुलांचे भविष्य कसं जाईल, त्यांचे आयुष्य कसे जाईल या विचारात असतात. तर अनेक पालक इमोशनल ब्लॅकमेलही करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे लग्नाबाबत तरुणांचे विचार बदलत चालले आहेत. जसे की, काहीजण एकट राहणे पसंत करतो. त्यांना असे वाटते की लग्न हे त्यांच्या करिअरमध्यो अडथळा ठरू शकतात. ज्यामुळे ते एकतर उशिरा तरी लग्न करतात किंवा लग्न करतच नाही. अशातच एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये मुलींना लग्न का करायचं नाही, त्याचे कारण समोर आले आहे. 


दरम्यान, नुकतेच एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अभ्यास डेटा विश्लेषक ‘मिंटेल’ने केला आहे. या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की 49% पुरुष अविवाहित असूनही आनंदी आहेत. आणि 61% महिला एकट्या राहतात. सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 75% अविवाहित मुलींनी जोडीदाराचा शोधही घेतला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  तर मुलींच्या तुलनेत 65% मुले अशी आहेत ज्यांनी लग्नाचा विचारही केला नाही. 


या कारणासाठी लग्न करत नाहीत?


असे म्हणतात की, लग्नानंतर पवित्र नाते जपण्याची जबाबदारी मुलांपेक्षा मुलींवर अधिक असते असं अभ्यासात म्हटले आहे. नातेसंबंध जपण्यासोबतच त्यांना घरची कामे करावी लागतात जसे की स्वयंपाक करणे, कुटुंबाची काळजी घेणे, कौटुंबिक संस्कार चांगले ठेवणे इत्यादी. लग्नानंतर त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. याशिवाय त्यांना जीवनात काही साध्य करायचे असले तरी त्यांना त्यांच्या कामासोबतच घर सांभाळणेही कठीण जाते. म्हणूनच लग्नात करण्याचा नकार देतात.


दुसरीकडे, पुरुषप्रधान देशात मुलींची घुसखोरी होत असल्याचा दावा केला जात आहे. ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या इच्छेनुसार जगता आहेत. लोक काय म्हणतील? हा विचार बाजूला ठेवून आजकालच्या मुली स्वतंत्र आयुष्य जगत  आहेत . त्यामुळे पूर्वीपेक्षा अविवाहित मुलींची संख्या वाढत आहे. तसेच मुलींना एकटे राहण्यात कोणतीही अडचण येत नाही. मुलींचा असा विश्वास आहे की, पत्नी आणि आई बनल्याने त्यांना आनंग मिळेल  याची शाश्वती नसते. त्यांना एकटे राहून आनंद मिळतो आणि त्यात गैर ते काय? ते स्वावलंबी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जोडीदाराची गरज भासत नाही, असा खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे.