Side Effects Of Skipping Dinner: अन्न, वस्त्र निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत. दोन वेळचं जेवण हे आपल्या जगण्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरासाठीही ते फारच महत्त्वाचं असतं परंतु जर का आपण एकदा जरी जेवण करणं टाळलं तरीसुद्धा त्याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो हे नक्की. सध्या अभिनेता सलमान खान याचं एक वक्तव्य चर्चेत आहे. तो म्हणाला की, गेल्या 25-26 वर्षांपासून त्यानं रात्रीचं जेवण (Dinner) हे केलेलं नाही. इतकी वर्षे सलग रात्रीचं जेवण न केल्यानं नक्कीच सर्वांचाच भुवया उंचावल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काळजी करू नका तो घराबाहेर कुठेच बाहेर जेवायला गेलेला नाहीये असं तो म्हणाला आहे परंतु यावरून एक विषय प्रकाशानं समोर येतो तो म्हणजे खरंच जर का रात्रीचं जेवणं टाळलं तर काय होईल? यावरून तुम्हाला-आम्हाला हा प्रश्न पडतो की नक्की याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर किंबहूना जीवनशैलीवर काय वाईट/ चांगला परिणाम होतो? 


मुळात रात्री जेवण स्कीप करण्याची सवय ही अत्यंत वाईट असते. आपल्यासाठी ती चांगलीही नसते. रात्री आपल्याला हलकं फुलकं जेवण करण्याचा सल्ला दिला जातो परंतु अनेक जणं ते ही घेतं नाहीत. हा विषय गंभीर आहे. या लेखातून आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की रात्रीचं जेवण स्कीप केल्यानंतर काय होतं? लोकं रात्रीचं जेवण स्कीप करतात याला मुख्य कारण असतं ते म्हणजे वजन नियंत्रित करणं. वजन नियंत्रित करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळणं हे योग्य ठरू शकणार नाही. आपल्याला शरीरातील फॅट्स आणि कॅलरीज कमी होणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळणं. 


  • अन्नातून आपल्या उर्जा मिळते. त्यातून तुम्ही रात्रीचं जेवण टाळलंत तर मात्र तुमच्या शरीराला उर्जा मिळणार नाही. आपल्याला थकवा अथवा अशक्तपणा जाणवू शकतो. आपला ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण यात बराच फरक असतो तेव्हा रात्रीचं जेवण टाळतं तर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. 

  • आपण रात्री नीट जेवलो नाही तर आपल्याला झोपही येत नाही. त्यामुळे अशावेळी जर का आपण जेवणंच केलं नाही तर आपल्या झोपेवरही त्याचा विपरित परिणाम होतो आणि झोप अपुरी झाली तर मात्र त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो यात शंका नाही. 

  • जर का आपण रात्रीचं जेवणं टाळालंत तर आपल्या शरीरात न्यूट्रीएंट्सची कमतरता जाणवते. 

  • आपल्या पचनसंस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. पचनक्रिया फसली तर त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होणार. 


त्यामुळे रात्रीचे जेवण हे स्कीप करणं टाळू नका. आपल्या शरीराला योग्य उर्जा मिळणं हे आवश्यक असते. योग्य आहार आणि झोप झाली तर आपला दुसरा दिवसही अत्यंत प्रफुल्लित होतो आणि आपली जीवनशैलीही सुधारते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)