लग्नानंतर महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? पाहून वाटेल आश्चर्य!
Google Search : गुगलवर किती विचित्र गोष्टी शोधल्या जातात याची तुम्हाला जाणीव असेलच. याच यादीमध्ये लग्न झालेल्या महिला देखील आहेत. लग्नानंतर महिला असं काही गुगलवर सर्च करत असतात जे ऐकून अनेक पुरुषांना नक्कीच धक्का बसेल.
Trending News : आजच्या काळात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर गुगलसारखा चांगला पर्याय नाही. गुगलवर आपल्या सर्व कठीण आणि विचित्र प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण गेल्या काही वर्षांत गुगल आपल्या गरजांचा एक भाग बनली आहे. काही वेळा लोक अशा गोष्टी शोधतात, ज्यामुळे त्यांना त्यांची हिस्ट्री डिलीट देखील करावी लागते. अशा वेळी प्रश्न पडतो की विवाहित महिला गुगलवर काय सर्च करत असतील? कारण एका अभ्यासानुसार लग्नानंतर महिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी गुगलची मदत घेतात. पण महिला जे काही सर्च करतात हे जाणून तुम्हाला एकतर हसू आवरणार नाही किंवा आश्चर्य वाटेल.
गुगल ट्रेंड्सकडून दरवर्षी असे अहवाल समोर येतात. पण नुकताच एक अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात हे समोर आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, गुगलने नुकताच हा डेटा जारी केला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की विवाहित महिला गुगलवर सर्वात जास्त काय शोधतात?
गुगलच्या माहितीनुसार, बहुतेक विवाहित महिला आपल्या पतीशी संबंधित अनेक गोष्टी शोधतात. महिला गुगलला त्यांच्या पतीच्या आवडी-निवडीबद्दल सर्वाधिक प्रश्न विचारतात. मात्र, यामध्ये काहीही गैर नाही.
काय सर्च करतात विवाहित महिला?
- पतीच्या आवडीनिवडींबाबत कसं ओळखावं?
- पतीचं मन कसं जिंकावं?
- नव्या कुटुंबात कसं मिसळावं?
- पतीच्या साथीनं कुटुंबाची जबाबदारी कशी घ्यावी?
- बाळाच्या जन्माचा निर्णय कधी घ्यावा?
- आपला मनमानी कारभार कसा चालवावा?
- पतीला मुठीत कसं ठेवावं?