छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे? महाराजांचं मूळ चित्रं पाहिलं आहे का?
Shivjayanti 2024 : पूर्वीच्या काळात आजसारखे कॅमेरे किंवा मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वीची एखादी व्यक्ती नेमकी कशी दिसत असणार हे सांगणे कठीणच...मग आपली राजे छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, त्यांचा मूळ चित्रं तुम्ही पाहिलं आहे का?
Chhatrapati Shivaji Maharaj Original Photo : भारताचं आराध्य दैवत, आपले राजे, आपला देव असे छत्रपती शिवाजी महाराज आजही भारतीयांच्या श्वासा श्वास वसले आहेत. जय शिवाजी जय भवानीचा नारा देताच एक वेगळाच संचार आपल्याला रक्ता रक्तात होतो. येत्या सोमवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. महाराष्ट्रासाठी हा सर्वात उत्साहाचा दिवस असतो. आजही अनेक घरांमध्ये मुलं महाराजांची शौर्य कथा ऐकून मोठे होते आहेत. अशात साधणारण साडेतीनशे वर्षांपूर्वीची आपले महाराज नेमके दिसायचे कसे याची कल्पनाही आपण करु शकत नाही. (What exactly did Chhatrapati Shivaji Maharaj look like Have you seen the original pictures of Maharaj Shivjayanti 2024)
राजे कसे दिसायचे?
उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे, नेत्र तेजस्वी आणि बुद्धीमत्ता दर्शवणारे, असं वर्णन फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो यांनी केलं आहे. 1666 साली सुरतमध्ये जॉन द तेवनो प्रवासाला आले होते तेव्हा दख्खनमध्ये त्यांनी शिवाजी महारांना पाहिलं होतं.
शिवाजी महाराजांचं मूळ चित्रं
पण शिवाजी महाराजांचं खरंखुरं विश्वासार्ह चित्र हे श्रेय इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी शोधून काढलं होतं. भारतीय इतिहास संशोधन केंद्रात बेंद्रे काम करत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले होते, असं म्हणतात. अथक परिश्रमातून बेंद्रे यांनी युरोपातून मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रं हस्तगत केली. त्यावेळी डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना एक रेखाचित्र सापडलं, जे शिवाजी महाराजांचं असल्याचा त्यात उल्लेख करण्यात आला होता.
सुरत मोहीमेदरम्यान तिथल्या डच वखारीचे गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली असता तेव्हा दोघांची चित्रं रेखाटण्यात आल्याच सांगण्यात आलंय. हे महाराजांचं दुर्मिळ चित्र मानलं जातं.
गोवळकोंडा शैलीतील शिवाजी महाराजांची चित्रं
गोवळकोंडा भेटीदरम्यान कुतुबशहाच्या दरबारातील चित्रकारानं राजांचं चित्र रेखाटलं होतं अशी इतिहासात माहिती समोर येते. ही चित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातही पाहाण्यास मिळते.
दरम्यान शिवाजी महाराजांची त्या काळातली साधारण 27 चित्रं प्रकाशित झाली असून त्यातील बहुतांश चित्रं ही परदेशात असल्याचं माहिती देण्यात आली आहे.
लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात हे महाराजांचे चित्र 1683-85 साली काढण्यात आले असेल असा इतिहासात उल्लेख आहे.
पॅरिसमधील हे चित्र 1680 मध्ये रेखाटल गेलं होतं असा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आहे.
हे चित्र प्रसिद्ध चित्रशाळा किशनगडमधील सावंतसिगं महाराज यांचं चित्रकार निहाल चंद्र यांनी 1750 साली असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. हे चित्र पाहिलं तर यात राजांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दानपट्टा दिसत आहे. हे चित्र लंडनमधील बॉनहॅम्सच्या संग्रहालयात पाहिला मिळतं.
फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात 1865 साली गोवळकोंडामधील काढलेले शिवरायांचं चित्र पाहिला मिळतं. हे चित्र राजांचा वृद्धापकाळातील असावे असं म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांचं उभं चित्र फ्रांसमधील राष्ट्रीय ग्रंथालयात 17 व्या शतकात काढल्याचा उल्लेख इतिहासात पाहिला मिळेल. ह्या चित्रामध्ये शिवरायांचा उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात पट्टा पाहिला मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले हे खालील चित्र आहे 1785च्या युनिव्हर्स पिक्चर आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात आपल्याला पाहिला मिळतात. हे चित्र अँटोन झेनेटी या चित्रकाराने काढलंय.
18व्या शतकातील राजपूत मुघल शैलीतील चित्र राजस्थानमधून सापडलं आहे.