गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार
Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?
Health News : आजारपण हे फक्त शारीरिक नसून, मानसिकही असतं या मुद्द्यावर मागील काही वर्षांमध्ये अनेकांचाच विश्वास बसला असून, मानसिक आरोग्यालाही प्राधान्यस्थानी ठेवून त्यावर गंभीर मुद्द्यावर चर्चा केली जाते. असाच एक गंभीर मुद्दा म्हणजे गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर भीती वाटणं.
अनेकांनाच प्रचंड गर्दी असणाऱ्या ठिकाणी गेलं असता भीती वाटते, पोटात गोळा येतो. ही एक मानसिक स्थिती असून, यामध्ये अमुक एका व्यक्तीच्या मनात दडलेली भीती कोणत्या न कोणत्या रुपात बाहेर येते. त्या व्यक्तीचं डोकं गरगरू लागतं, हातपाय थरथरू लागतात. अनेकांनाच गर्दी पाहिली की Panic Attack सुद्धा येतो. या मानसिक स्थितीला 'एगोराफोबिया' हा शब्द असून, ही एक Anxiety Disorder अर्थात अस्वस्थतेची स्थिती आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते एगोराफोबियानं त्रस्त असणारी व्यक्ती सर्वसाधारण भेटीगाठीसुद्धा टाळते. ज्यामुळं अशा व्यक्ती बऱ्याचदा एकाकीपणाशीही झुंज देताना दिसतात. वेळीच या लक्षणांकडे गांभीर्यानं न पाहिल्यास या व्यक्ती नैराश्य, Social Anxiety किंवा Panic Attack अशा समस्या भेडसावतात.
काय आहेत एगोराफोबियाची मुख्य लक्षणं?
- गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करणं
- घराबाहेर निघण्यासही एखाद्या व्यक्तीनं सतत नकार देणं
- सार्वजनिक ठिकाणी प्रवास टाळणं
- बरीच लोकं असणाऱ्या एखाद्या सोहळ्यासाठी गैरहजर असणं
- गर्दीच्या ठिकाणी गेलं असता डोकं गरगरणं, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं
- हातपाय थरथरणं, गर्दीच्या ठिकाणी घाम फुटणं, तोंडाला फेस येणं, घसा कोरडा पडणं
हेसुद्धा वाचा : एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?
या मानसिक स्थितीपासून कशी करून घ्याल सुटका?
- आरोग्यदायी जीवनशैली आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या
- नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करा
- मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद साधा
- मद्यपान किंवा कॅफिनयुक्त द्रव्यांचं सेवन टाळा
- मनातील भीती बाहेर काढण्यासाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण मिळवा
- कल्पनाशक्ती प्रबळ आणि सकारात्मक करा
- तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं टाळा