आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे... म्हणजे प्रेमाचा दिवस... पण गेल्या कित्येक वर्षात प्रेमाचं स्वरुप बदलत चाललंय.... अगदी काही मित्र मिळून आपल्या मित्रासाठी डेट शोधणार इथपासून सुरु झालेला हा प्रवास आता ऑनलाईन डेटिंगवर पोहोचला आहे. पण आपल्या आजूबाजूला असलेल्या Gen Z या पिढीमध्ये नक्की काय चाललंय? माहित आहे का? त्यांच्यामध्ये एका नव्या कन्सेप्टची निर्मिती झालीय ती म्हणजे Hesidating... 


Hesidating म्हणजे काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hesidating हे मॉर्डन डेटिंग कन्सेप्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे हा ड्रेंट Covdi 19 नंतर सुरु झाला आहे. या डेटिंग पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःला चाचपडून पाहतात की, ते प्रेमासाठी कॅपेबल आहेत की नाही. जी व्यक्ती आपल्या प्रेमाची कबुली द्यायला घाबरतात. ज्यांना आपलं नातं खूप दिवस टिकेल की नाही हे कळत नाही. ते या पद्धतीचं डेटिंग करतात. 


असुरक्षितता न दाखवणे 


जी व्यक्ती Hesidating पद्धतीने डेट करत असेल तर ती व्यक्ती आपल्याला वाटणारी असुरक्षितता देखील योग्य पद्धतीने स्पष्ट सांगू शकत नाही. जर अशा व्यक्तीच्या जोडीदाराने जरी आपल्या मनातील असुरक्षिततेची भावना व्यक्त केली तरी देखील पहिली व्यक्ती त्याबद्दल आपल मत व्यक्त करत नाही. किंवा अगदी सहज टॉपिक बदलला जातो. हाच तो लाल झेंडा दर्शवणारा संकेत आहे ज्यामध्ये समोरची व्यक्ती Hesidating नात्यात असल्याचं अधोरेखित होतं. 


स्वतःला गुंतवत नाही 


नातं घट्ट होण्यासाठी दोघांची भावना तितकीच महत्त्वाची आहे. जर एखादी व्यक्ती आऊटिंगचा प्लान करत असेल किंवा चर्चेला स्वतःहून सुरुवात करत असेल तर हे हेल्दी रिलेशनशिपचं लक्ष आहे. पण एखादी व्यक्ती जर डेटिंगला गेल्यावर सतत फोन बघत असेल किंवा मॅसेजेसला रिप्लाय देत असेल तर ती व्यक्ती Hesidater होत असल्याचं अधोरेखित होतं. 


त्यांचे प्रश्न विचित्र असतात 


कोणतंही नातं हे विश्वास आणि संवादावर निर्माण होतं. नात्यामध्ये कायमच एकमेकांना उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले जातात. पण सुरुवातीच्या काळातच तुम्हाला त्या प्रश्नांमधून चांगले वाईब्स आले नाहीत. त्यामुळे या नात्यातील सगळ्या प्रश्नांकडे थोडं नीट लक्ष द्या. 


महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करतात 


आपण आपलं नातं भविष्यात कुठे पाहतो? किंवा तुला आयुष्यात कशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे? तुला भविष्यात कुठे राहायचं?  या प्रश्नावर सहज दुर्लक्ष केलं जातं. यावरुन हे नातं हेसीडेटिंग असल्याचं अधोरेखित होतं. 


शेवटच्या क्षणी प्लान रद्द करणे 


हेसीडेटिंग रिलेशनशिप सांभाळणारी व्यक्ती शेवटच्या क्षणी प्लान रद्द करू शकते. काहीही कारण देऊन ठरवलेला प्लान रद्द केला जाऊ शकतो. हेसिडेटिंग करणारी व्यक्ती कोणतंच प्लान फार मनावर घेऊन करत नाही. प्लान रद्द करणे आणि त्याबाबत कोणतीही अपराधी भावना नसणे हेच Hesidating नात्याचं लक्षण आहे.