Best time to eat Breakfast Lunch and Dinner : सकाळचा नाश्ता,  दुपारचे  जेवण आणि रात्रीचे जेवण असा आपला आहाराचा दिनक्रम असतो. पण काहीजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी सतत काही ना काही खात असतो. अशावेळी काही पदार्थ चटकदार असतात तर काही पदार्थ आरोग्यदायी असतात. अशातच खाण्या- पिण्याची योग्य वेळ आपल्या शरीरावर परिणाम करत असते. अनेकांना सवय असते ऑफीसमध्ये कामाच्या गडबडीत अनेकजण नाश्ता वगळतात. त्यामुळे दुपारच्या जेवणाच हे अधिक प्रमाणात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर सकाळचा नाश्ता वगळला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. यामध्ये वात, पित्त आणि कफवर परिणाम होऊन संतुलन बिघडते, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. सकाळा नाश्ता आणि रात्रीचे जेवण नेहमीच आरोग्यदायी असते असे अनेकांना वाटते, पण दुपारच्या जेवणाचा फारसा विचार केलेला दिसत नाही. बरेच लोक सकाळी नाश्ता करुन दुपारचे जेवण करत नाही. मात्र हे शरीरासाठी योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत असतं. तर काहीजण कामाचा ताणामुळे दुपारचे जेवन जेवच नाही. अशावेळी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण कधी करावे ते जाणून घ्या... 


नाश्ताची योग्य वेळ कोणती? 


आयुर्वेदानुसार सकाळी 7 ते 8 या वेळेत नाश्ता करणं योग्य वेळ आहे. झोपेतून उठल्यानंतर लगेच एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर ताज्या व्हा. असे केल्याने तुमचे पोट साफ होईल आणि चेहरा चमकेल. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासानंतर काहीतरी खावे लागेल. तुम्ही बराच वेळ जेवले नाही तर तुम्हाला गॅस होऊ शकतो. तसेच 8 वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी 1  पर्यंत दुपारचे जेवण करा. साधारण सकाळच्या नाश्तामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये इतके अंतर योग्य आहे. 


नाश्ता आणि दुपारच्या जेवणात काय फरक आहे?


दुपारी 12 ते 2.30 च्या दरम्यान जेवण करा. नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये 4 तासांचे अंतर असणं गरजेचे आहेय. सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नका, कारण त्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो.  तुम्ही साधारण 12 दरम्यान जेवण योग्य आहे. मात्र सहसा तुम्ही नाश्ता न करण्याच निर्णय घेऊ नका. कारण असे केल्याने आरोग्याला हानिकारक ठरु शकते. तसेच नाश्ता न केल्याने डोकेदुखी आणि अन्य समस्या निर्माम होऊ शकतात. 


दुपारच्या जेवणासाठी उशीर नको


काही लोकांना कामाच्या गडबडीत जेवण करयाला मिळत नाही. त्यामुळे कधीकधी 4 वाजता जेवताना असं करणे चुकीचे आहे. उशीरा जेवल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच वजनही झपाट्याने वाढते. 


रात्रीचे जेवण किती वाजता? 


रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या 2 ते 3 तासांपूर्वी करायला हवे. परंतु रात्रीचे जेवण 6 ते 8 दरम्यान करावे. आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी तीन तास जेवण करुन गरजेचे आहे.  त्यामुळे शरीरात अन्नाचे पचन चांगले होते. तसेच रात्री 9 नंतर जेवू नका, असे केल्याने अन्न पचनाच समस्या निर्माण होऊ शकते.