रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर हात धुण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला फिंगर बाऊल दिलं जातं. यामध्ये कोमट असं पाणी आणि लिंबूचा तुकडा टाकला जातो. या फिंगर बाऊलमध्ये हात धुवायला प्रत्येकाला आवडतं. फिंगर बाऊल देण्यामागे काय कारण असतं तुम्हाला माहित आहे का? फिंगर बाऊलची ही पद्धत नेमकं कुठून आली? ती पद्धत भारतात कशी पोहोचली? 


या परंपरेमागेचं कारण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिंगर बाऊल म्हणजे पाण्याने भरलेली वाटी. ज्यामध्ये लिंबाचा छोटा तुकडा असतो. लिंबाचा तुकडा आता टाकण्यास सुरुवात केली आहे. कारण आजपर्यंत अशी कोणतीही प्रथा समोर आलेली नाही ज्यात फिंगर बाऊलमध्ये लिंबू टाकणे आवश्यक मानले गेले आहे. लिंबू फक्त हातातील जंतू आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी घातला जातो. कारण लिंबूमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जंतू नष्ट करतात. लिंबूने हात स्वच्छ केल्याने हातातील अन्नाचा वासही दूर होतो. त्यामुळे आता फिंगर बाऊलमध्ये लिंबाचा तुकडा टाकला जात आहे.


भारतात ही परंपरा कुठून आली? 


'फिंगर बाऊल'ची ही परंपरा अमेरिकेतून सुरु झाली आहे.पहिल्या विश्व युद्धाच्यावेळी जेव्हा देशातील प्रतिनिधी एकत्र महागड्या रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्समध्ये भेटत. तेव्हा त्यांना हात धुण्यासाठी फिंगर बाऊल देण्यात येत असे. त्यानंतरच ही प्रथा सुरु झाली आहे. आता ही पद्धत सामान्य हॉटेल्समध्येही सुरु आहे. 


एटिकेट्स किती महत्त्वाचे 


फिंगर बाऊल वापरण्यामागे एटिकेट्स देखील दडलेले आहेत, जे कुणाला माहित नाही. यामध्ये हात धुताना फक्त बोटं पाण्यात घातली जातात. यामध्ये संपूर्ण हात टाकला जात नाही. 


अनेकदा काहीजण फिंगर बाऊलमधील संपूर्ण लिंबू पिळून घेतात. पण ही योग्य पद्धत नाही. जर बोटांना जेवणाचं तेल लागलं असेल तर ते साफ करण्यासाठी लिंबू हाताला चोळणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. 


अशावेळी विनाकारण फिंगर बाऊलमध्ये लिंबू पिळण्याची गरज नाही. कारण लिंबू पिळणे हे वेल मॉनर्स समजले जात नाहीत. 


आपण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जातो. अशावेळी तिकडचे एटीकेट्स आणि नियम समजून घेणे गरजेचे असते. ज्याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या जागेचा वापर करण्यास होतो.