Why Jaya Bachchan Is Alway Angry: समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या हल्ली मनोरंजनसृष्टीतील कामापेक्षा त्यांच्या राजकीय आयुष्यामुळे चर्चेत असतात. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांनी लावलेली हजेरीही चर्चेत असते. नुकतेच त्यांनी राज्यसभेमध्ये पतीच्या नावाने उल्लेख झाल्यावर आक्षेप घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संतापून त्यांनी केवळ जया बच्चन नावाने उल्लेख केला असता तरी चाललं असं सभापतींना ऐकवलं. मात्र जया बच्चन यांना असा राग येण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा त्या छोट्या छोट्या गोष्टींवरुन पापाराझींवर रागावल्याचं दिसून आलं आहे. जया बच्चन या शीघ्रकोपी आहेत असंही म्हटलं जातं. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होत असतात. अर्थात फोटो काढून घ्यावा की नाही हा जया बच्चन यांचा वैयक्तिक इच्छेचा प्रश्न असला तरी त्यांचं हे असं संतापणे कायमच चर्चेत असतं. 


अभिषेक बच्चन आईला राग का येतो यावर का बोलला होता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता जया बच्चन यांच्या या विधानाची चर्चा असतानाच त्यांच्या लेकीचा म्हणजेच श्वेता बच्चनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातील आहे. श्वेता बच्चन या कार्यक्रमात अभिषेकबरोबर सहभागी झाली होती. त्यावेळेस त्याने तिच्या आईला एवढा राग का येतो याबद्दल भाष्य केलं होतं. श्वेताला करण जोहरने जया बच्चन एका फोटोग्राफरवर ओरडत असल्याच्या व्हिडीओचा संदर्भ देत जया बच्चन अशा अचानक का चिडतात? त्यांना एवढा राग का येतो? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अभिषेक बच्चनने मजेदार उत्तर देताना, "मी जेव्हा माझ्या कुटुंबासोबत घराबाहेर पडतो तेव्हा देवाकडे प्रार्थना करतो की कोणी पापाराझी आमच्या आजूबाजूला असून नये," असं म्हटलं. हे उत्तर ऐकून सर्वच हसू लागले. पापाराझी आजूबाजूला असतील तर त्यांना जया बच्चन यांचा ओरडा खावा लागेल असा अभिषेकच्या बोलण्याचा रोख होता. 


जया बच्चन यांना आरोग्यासंदर्भातील ही समस्या


मात्र या प्रश्नाला उत्तर देताना श्वेता बच्चनने, माझ्या आईला फोटो काढून घेणं अजिबात आवडत नाही, असं सांगितलं होतं. श्वेताने पुढे बोलताना, जया बच्चन क्लॅस्ट्रोफोबिक आहेत असं सांगितलं. म्हणजेच जया बच्चन यांच्या आजाबाजूला खूप सारे लोक असतात तेव्हा त्यांना गुदमरल्यासारखं किंवा अडकून पडल्यासारखं वाटू लागतं. तसेच पुढे बोलताना श्वेताने, न विचारता कोणी आपला फोटो काढलेलंही आईला आवडत नाही असा खुलासा केला. एवढ्यावरच न थांबता श्वेताने आईला सेल्फी काढायलाही आवडत नाही असं सांगितलं. आपला सेल्फी फोटो चांगला येत नाही, असं आईचं म्हणणं असतं असं श्वेता हसत म्हणाली होती. 


क्लॅस्ट्रोफोबिक म्हणजे काय?


क्लॅस्ट्रोफोबिक व्यक्तींना गर्दी असेल किंवा जास्त लोक असतील तर अवघडल्यासारखं होतं. त्यांना अस्वस्थ वाटू लागतं. त्यांना गुदरल्यासारखं होऊ लागतं. क्लॅस्ट्रोफोबिक व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतात. सीबीटी, एक्सपोजर थेरपी, औषधं आणि स्वयंनियंत्रणाच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.


क्लॅस्ट्रोफोबिक असल्याची लक्षणं कोणती?


अचानक शरीर थरथर कापू लागणे.


घाम येणे.


श्वास गुदमरणे.


श्वास घेण्यास अडचण होणे.


अचानक गरम होणं किंवा थंडी वाजू लागणं.


हृदयाचे ठोके वाढणे.


छातीत दुखणे किंवा छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटणं.


पोटात गोळा येणे.