आपल्याला लहान मुलांचा खोडकरपणा किंवा त्यांनी केलेली मस्ती मजेशीर वाटते. पण काही गोष्टी वेळीच रोखणे गरजेची असते. कारण काही मुले अचानक खेळताना तुमच्यावर हात उगारतात आणि मारायला लागतात. अशावेळी लहानपणी मुलं अशा गोष्टी नकळत करतात आणि या वागण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे पालक हे सर्व सहन करतात. पण तुमचे मूल तुम्हाला विनाकारण वारंवार मारत असेल तर ही परिस्थिती कोणत्याही पालकांसाठी लाजिरवाणी ठरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या प्रेमाचा आणि निष्काळजीपणाचा हा परिणाम मुलांवर होत असेल तर पालकांनी आधीच सावध होणे गरजेचे आहे. अशावेळी पालकांनी स्वतःला दोष देऊ नये. दिव्या कौर गिलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने सांगितले की, जर तुमच्या मुलाने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तर ही परिस्थिती हुशारीने हाताळा. रागावण्याऐवजी खालील टिप्स फॉलो करुन ही सवय सुधारा.


मनाला लावून घेऊ नका 
तज्ज्ञ म्हणतात की, जर तुमचे मूल 5 वर्षांपेक्षा लहान असेल आणि तो तुम्हाला मारत असेल तर ते फार मनाला लावून घेऊ नका. कारण तो या टप्प्यावर असतो जेव्हा तो त्याच्या भावनांना सामोरे जायला शिकत असतो. अनेक वेळा मुलाला जे हवं ते मिळत नाही, तेव्हा तो त्याच्या भावना नीट व्यक्त करू शकत नाही. अशा परिस्थितीत तो भांडणातून आपला राग दाखवतो. त्यामुळे शांत राहा आणि त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की, तो अजूनही त्याच्या भावनांना कसे सामोरे जायचे हे शिकत आहे.


प्रेमाने थांबवा हात 
मुलांच्या या वागण्यावर कुणालाही राग येऊ शकतो. पण स्वतःवर नियंत्रण ठेवा. जर तुमचे मूल तुम्हाला विनाकारण मारत असेल तर त्याचा हात प्रेमाने धरा किंवा त्याला तुमच्यापासून थोडे दूर ठेवा. यावेळी तुम्ही त्यांच्यावर ओरडणे टाळावे.


प्रेमाने वागा 
जेव्हा मुल तुमच्यावर रागाने हात उचलेल तेव्हा त्याला शिव्या देऊ नका. त्याऐवजी, त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवा. उदाहरणार्थ, तुम्ही त्याला म्हणू शकता – मला माहित आहे की मी तुला मोबाईल पाहायला दिला नाही म्हणून तुम्हाला राग येत आहे. मला माहित आहे की तुला बाहेर जायचे होते, पण तू जाऊ शकला नाहीस. याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी सहमत आहात असा नाही. त्याऐवजी, तुम्हाला त्याच्या समस्या समजल्या आहेत आणि तुम्ही नेहमी त्याच्यासोबत आहात याची त्याला जाणीव करून द्या. जर तुमच्या मुलाने तुम्हाला मारले तर याचा अर्थ असा आहे की तो त्याच्या भावनांना सामोरे जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तीची मदत हवी असते. प्रत्येक पालकाने अशा परिस्थितीला मोठ्या संयमाने हाताळले पाहिजे.