रेमंड ग्रुप सध्या घरगुती वादामुळे चर्चेत आहे. रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील घटस्फोट आणि वाद चर्चेचा विषय असतानाच. विजयपत सिंघानिया यांनी केलेले आरोप देखील आता चर्चेत आले आहेत. विजयपत सिंघानिया यांनी मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण संपत्ती मुलाच्या नावावरुन करून चूक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या जुहूमधील 'प्रतिक्षा' हा बंगला मुलगी श्वेता हीच्या नावे केला आहे. जवळपास 50 करोडचा हा बंगला मुलीच्या नावावर केला आहे. या दोन्ही प्रकरणांवरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


काय आहे चर्चा?


एका बाजूला विजयपत सिंघानिया यांनी मुलाच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करून चूक केल्याचं म्हटलं आहे. त्यांना पालकांना सल्ला देखील दिला की, मुलाला सर्व काही देणं ही सर्वात मोठी चूक. तर दुसरीकडे बच्चन यांनी मुलीला बंगला दिला त्यामुळे मुलगा-मुलगी अशी तुलना होत आहे. मुलगा वडिलांशी असा वागला आणि दुसरीकडे वडिलच मुलीला समान हक्क देत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 


पालकांनी काय करावे


अनेकदा पालकच लहानपणापासून मुलगा-मुलगी असा भेद करतात. हे मुद्दामून केलं जातं का, तर अजिबात नाही. पण कळत नकळत पालकांकडून या गोष्टी होतात. तेव्हा पालकांनी सतर्क राहून मुलगा आणि मुलगी या दोघांवरही संस्कार करणे गरजेचे आहे. 


मुलांना द्यावी समान वागणूक 


पालकांनी मुलगा-मुलगी या दोघांनाही समान वागणूक द्यावी. नियम दोघांनाही समान असावेत. एवढंच नव्हे तर शिक्षणाचे स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र हे देखील समान असावेत. घरातील कामे मुलीसोबतच मुलाला देखील शिकवावीत. तसेच बँक किंवा बाहेरची काम मुलासोबतच मुलीला देखील शिकवावीत. यामुळे मुलांमध्ये समान वागणूक असल्याचे अधोरेखित होते.   


कसं वागायचं? 


अनेकदा पालक मुलीला कसं वागायचं याचे धडे देतात. जसे की, अनोळख्या मुलासोबत बोलू नये. किंवा नातेवाईकांसमोर कसं वागायचं याचे सल्ले दिले जातात. अशावेळी पालकांनी मुलाला देखील त्याने मुलींशी कसे वागावे? त्यांना समान वागणूक द्यावी याबाबत संस्कार करावेत. 


जे आहे ते दोघांचं 


आता पालकांची संपत्ती किंवा त्यांचा विचार हा दोघांचं असल्याचं हा विचार रुजू होत चालला आहे. पालकांनी हा विचार दोन्ही मुलांमध्ये रुजवावा. कारण संस्कार करत असताना तुम्ही समान वागणूक दिलात तर हा विचार मुलांच्या मनात कळत नकळत रुजवला जाऊ शकतो.