Friendship Day 2024 : 30 जुलै की 4 ऑगस्ट कधी आहे यंदाचा फ्रेंडशिप डे?
Friendship Day 2024 Date In India: दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण यंदा हा दिवस नेमका कधी साजरा करायचा 30 जुलै की 4 ऑगस्टला?
Friendship Day 2024 Date In India: मैत्रीचे नाते हे अनमोल नाते समजले जाते. या नात्याला खास बनवण्यासाठी भारतात दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मैत्रीचे अतूट बंध साजरे करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. या दिवशी सर्व मित्र एकत्र येतात आणि त्यांचे नाते अधिक घट्ट करतात. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये रविवार, 4 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. तर इतर देशांमध्ये 30 जुलै रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
फ्रेंडशिप डे चा इतिहास
फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या इतिहासाविषयी सांगायचे तर, गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. याची सुरुवात 1958 मध्ये पॅराग्वे येथून झाली. पॅराग्वेमध्ये 30 जुलै 1958 रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव होता. 30 जुलै 2011 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून घोषित केले. जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी ३० जुलै रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.
फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे महत्त्व
यंदा 4 ऑगस्टला फ्रेंडशिप डे येत आहे. मित्रांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस नवीन मित्र बनवण्यास आणि जुन्या मित्रांसोबतचे नाते दृढ करण्यास मदत करतो. या दिवशी लोक आपला सर्व वेळ आपल्या मित्रांसोबत घालवतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. तुम्हालाही तुमच्या मित्रांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करायचा असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
असा साजरा करा दिवस
फ्रेंडशिप डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही दोघे मित्र एकत्र पिकनिकला जाऊ शकता आणि एकमेकांसोबत पूर्ण वेळ घालवू शकता. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा नवीन चित्रपट पाहण्यासाठी देखील जाऊ शकता. तुम्ही एकमेकांच्या घरी जाऊनही हा दिवस साजरा करू शकता. फ्रेंडशिप डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रासाठी गिफ्ट घेऊ शकता. तुमच्या मित्राला खूप आवडणारी गोष्ट गिफ्ट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मित्र आनंदी होईल.
मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा
मैत्री ही एक भावना आहे. ही भावना व्यक्त झाली पाहिजे. अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला मनातील विचार नक्की बोलून दाखवा. अशावेळी झी 24 तासने तयार केलेले खास मैत्री दिनाच्या शुभेच्छा तुम्ही एकमेकांना पाठवू शकता.