बुलिंग करण्यामध्ये म्हणजेच इतरांवर कारण नसताना वर्चस्व दाखवण्याची काही मुलांना अगदी लहानपणापासून सवय लागते. आपण बरोबर करत आहो की चूक याची त्यांना पूर्णपणे जाण नसते. मात्र ते ज्यांना 'बुलिंग' करतात म्हणजे ज्यांच्यावर दादागिरी करतात. त्यांच्याबरोबर स्वत: दादागिरी करणाऱ्या मुलांच्या मनावरही या साऱ्याला दिर्घकालीन परिणाम होत असतो. तुमचं मुलंही असं असेल तर काय करावं जाणून घ्या...


शांत राहा, माहिती मिळवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाचा हा स्वभाव कळल्यावर पहिलं शांत राहा. कारण रागावून किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही. तुमचं मुलं नक्की कसं वागतं? दादागिरी, बुली करताना मुलं नक्की कसं वागतं. त्याची तेव्हा विचार करण्याची पद्धत काय असते? तसेच अशी दादागिरी करताना त्याचा काय विचार असतो, हे देखील समजून घ्या. 


मुलाचं ऐकून घ्या 


सगळा प्रकार समजून घेतल्यामुळे सगळ्यात आधी मुलाशी संवाद साधा. कारण त्या मुलाचा असं वागण्यामागे काय हेतू आहे, हे देखील समजून घेणे महत्त्वाचे असते. अनेकदा मुलांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. अनेकदा ते मुलं स्वतः या अनुभवातून गेलेला असतो. त्यामुळे तो देखील इतरांशी तसेच वागतो. त्यामुळे त्याचं म्हणणं ऐकून घ्या. 


बाहेर पडण्यास मदत करा


मुलाला हा स्वभाव, दादागिरी करणे, लोकांना त्रास देणे हे चुकीचे असल्याचे सांगा. या अशा स्वभावातून त्याला बाहेर पडण्यास मदत करा. कारण कुणालाच अशा स्वभावात राहायचं नसतं.पण अनेकदा बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. पालक मुलांच्या अतिशय जवळचे असते त्यामुळे मोकळेपणाने बोलल्यानंतर त्यांना फायदा होईल. 


संवाद साधून थांबून नका 


मुलांशी संवाद साधून शांत राहू नका. कारण हा स्वभाव लगेच बदलणे सोपे नाही. वाईट गोष्टीशी संगत लगेच सुटत नाही. अशावेळी मुलांशी संवाद साधा. सतत त्यांच्या मनातील प्रश्न समजून घ्या. पुन्हा त्यांना या गोष्टी आकर्षित तर करत नाहीत ना याचा मागोवा घ्या. 


सकारात्मक राहा 


पालकांनी अशा परिस्थितीत सकारात्मक असणे गरजेचे असते. कारण पालकांचा विचार मुलांप्रती कसा आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पालकांनी सकारात्मक राहून मुलांशी कायम संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे.