5 Tips: हेमा-धर्मेंद्र यांच्याकडून शिका Long Distance रिलेशनशिपमध्ये कसं घट्ट कराल नातं!
Hema Malini-Dharmendra : `ड्रिम गर्ल` हेमा मालिनी यांनी सोमवारीच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला धर्मेंद्र यांची विशेष हजेरी होती. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधील हे लोकप्रिय कपल एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
Long Distance Relationship Benefits : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. हेमा यांच्या वाढदिवसाला अख्खी बॉलिवूड अवतरली होती. यामध्ये धर्मेंद्र यांची विशेष उपस्थिती होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या जोडीने प्रेक्षकांना भरभरून आनंद दिलाय. एवढंच नव्हे तर या दोघांची लव्हस्टोरी देखील सिनेमाच्या कथेला लाजवील अशी आहे.
असं असताना हेमा मालिनी आणि धर्मेंद्र आता एकत्र राहत नाहीत. हेमा मालिनी यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एकमेकांवर इतकं टोकाचं प्रेम करूनही हे दोघे एकमेकांपासून का लांब राहतात? आणि हेमा-धर्मेंद्र यांच्या लाँग डिस्टंट रिलेशनशिप (Long Distance Relationship) मधून 5 गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत.
अशी होती लव्हस्टोरी
हेमा-धर्मेंद्र यांची पहिली भेट 1970 साली 'तुम हसीन मैं जवान'च्या सेटवर झाली आणि तिथेच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. पण धर्मेंद्र हे विवाहित असून त्यांना चार मुले होती. असं असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करता यावं म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला. अनेक विरोध स्वीकारून यांनी लग्न केलं खरं पण आजही दोघं एकमेकांपासून वेगळे राहतात.
हेमा-धर्मेंद्र का राहतात वेगळे?
हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्या धर्मेंद्र यांच्यापासून वेगळ्या राहून दोन्ही मुलींचे संगोपन करत आहेत. कुणालाही अशा पद्धतीने राहायचं नसतं. पण परिस्थिती तशी निर्माण होते. आयुष्यात असं काही घडतं आणि असे मनाविरुद्धचे निर्णय घ्यावे लागतात. मात्र याबाबत वाईट वाटतं नाही. त्यांनी हे नातं अशापद्धतीने स्वीकारलं आहे. दोघं आजही वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहण्याचे फायदे
जोडीदाराचे कौतुक करता - एकमेकांपासून दूर राहून तुम्ही तुमच्या पार्टनरचे जास्त चांगले कौतुक करू शकता. एकत्र राहताना अनेकदा या गोष्टी राहून जातात.
वेळेला महत्त्व देता - लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकांच्या वेळेला महत्त्व देता. कारण तुम्हाला एकत्र फारच कमी वेळ मिळत असतो. तो क्षण फक्त प्रेमाचा असतो.
संवाद चांगला होतो - एकमेकांपासून दूर राहत असताना संवाद चांगला असणे गरजेचे असते. कारण तुमच्याकडे हाच एक पर्याय असतो जेव्हा तुम्ही एकमेकांच प्रेम कायम टिकवून ठेऊ शकता.
आत्मपरिक्षण करू शकता - एकमेकांपासून लांब राहता तेव्हा आत्मपरिक्षण करण्याची योग्य वेळ असते. तुम्ही सोबत असता तेव्हा एक जोडी म्हणून वागत असता पण वेगळे झाल्यावर आपल्या वागण्याचा आणि बोलण्याचा विचार करू शकता.
संयम येतो - एकमेकांपासून लांब राहत असताना तुमच्यामध्ये संयम येत असल्याचा अनुभव तुम्हाला येतो. दूर असताना बोलण्यावर मर्यादा येतात, भेटण्यावर मर्यादा येतात त्यामुळे तुम्ही अधिक संयमी होता.