Parenting Tips : मुलांचं संगोपन करताना लहानपणी तुम्ही त्यांना जसं घडवाल तशी ती मुलं घडत जाता. प्रत्येक पालक त्यांच्या कुवतीनुसार आपल्या मुलाला जगातील सगळ्यात चांगल पालकत्वाचा अनुभव देत असतात. पण अनेकदा आपण पाहिलं असेल मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर फक्त रडतात. म्हणजे त्यांच्या मनासारखं झालं नाही तरी रडतात किंवा त्यांना काही सांगायचं असेल तरीही रडतात. अशावेळी मुलांना इमोशनली स्ट्राँग करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांच्या भावनांवर लक्ष ठेवायला हव. आपलं मोठ्या कोणत्या वेळी कसं रिऍक्ट होतं हे समजून घेणे गरजेचे आहे. 


मुलांना कसे कराल इमोशनली स्ट्राँग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी कायमच मुलांच्या भावनांची कदर करायला हवी. मुलांना काय वाटतं याला महत्त्व द्यायला हवं. जर मुलं कोणत्या गोष्टीने घाबरत असेल किंवा त्याला बरं वाटत नसेल तर त्याला सतत ओरडू नका. त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा. कारण त्याला त्या भावनेतून बाहेर पडायला मदत करा. 


मुलांना ज्या गोष्टीमुळे त्रास होतो किंवा रडायला येतं त्या गोष्टी टाळा. पालकांशी संवाद साधून किंवा त्यांच प्रेम बघून मुलाच्या मनातील भीती जाते. त्यामुळे पालकांनी हे समजून घ्या की, मुलाशी संवाध साधून त्याच्या मनातील भावना ओळखून त्याला इमोशनली स्ट्राँग करु शकतो. मुलांची भावनिक आणि मानसिक दृष्ट्या स्ट्राँग असणे अत्यांत गरजेचे आहे. 


(हे पण वाचा - सुधा मूर्तींच्या सल्ल्याने मुलांचं करा संगोपन, डॉक्टर-आयएएस होतील मुलं) 


कधी कधी पालकांनी मुलांना रडू द्यावं. कारण मुलांनी फार भावनांना दाबून ठेवू नये यामुळे ते भावनिक दृष्ट्या कमकुवत होऊन जातात. 'आता रडणं बंद कर, शांत हो, मोठ्या मुलांसारखा वाग' मुलांना कधीच असा सल्ला देऊ नका. कारण ती मुले अनेकदा जास्त रडतात, असा पालकांचा अनुभव आहे. अशावेळी मुलांवर ओरडण्यापेक्षा त्याच्या भावना समजून घ्या. 


घरात मुलांना असुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवू नका. कारण या वातावरणाचा मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. जर मुलाकडून काही चूक झाली तर त्याला ओरडू किंवा मारू नका. यामुळे त्याच्या मनातील नकारात्मक भावना अधिक स्ट्राँग होईल. अशावेळी मुलाला भावनिकदृष्ट्या कसे ताकदवान बनवाल याची काळजी घ्या. तसेच मुलासमोर इतरांना देखील ओरडू नका. मुलांसमोर आपण काय बोलतो याची देखील विशेष काळजी घ्यायला हवी.