अगदी लहानपणापासून मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं आकर्षण आणि कौतुक असतं. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा त्यांचा असा विचार असतो. अशावेळी त्यांना पडणाऱ्या प्रश्नांनी ते पालकांना भांडावून सोडतात. तज्ज्ञ म्हणतात की, मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला पालकांनी उत्तर द्यावं. पण कधी कधी मुलं असा प्रश्न विचारतो की, याला त्याच्या नकळत्या वयात काय उत्तर द्याव हेच पालकांना कळत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक पालक मुलांना आपल्यासोबतच आंघोळ घालतात. मुलं यावेळी आपलं शरीर आणि पालकांचं शरीर बघून कुतुहल म्हणून अनेक प्रश्न विचारतात. एक चौकोनी कुटूंब, ज्यामध्ये आई-बाबा आणि दोन मुलं. लहान मुलगा बाबांना प्रश्न विचारतो की, तुमचे ब्रेस्ट आईच्या ब्रेस्टसारखे का नाहीत? सुरुवातीला पालक हसून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. पण मुलाचे प्रश्न काही संपत नाहीत. पुन्हा तोच प्रश्न मुलगा विचारतो. आता मात्र पालक विचार करतात? अशा प्रसंगाला तुम्ही देखील सामोरे गेलात का? अशावेळी काय कराल? 


मुलाच्या प्रश्नाला पालक अतिशय शांतपण उत्तर देतात. Male आणि Female अशा दोघांच्याही शरीराची रचना वेगळी असते. पुरुषांच्या शरीराची ठेवण वेगळी असते. जसे की, केस असतील स्तन असतील. महिलांची ठेवण वेगळी असते. महिलांना बाळाला स्तनपान करायचं असतं. त्यामुळे त्यांचे स्तन असे असतात. पण पुरुषांना बाळाला दूध पाजायचं नसतं म्हणून त्यांचं स्तन वेगळे असतात. 


मुलाचे प्रश्न येथेच संपत नाही. मग दीदीचे स्तन देखील आईसारखे होणार का? सुरुवातीला पालकांना काय बोलावे कळत नाही. पण ते या प्रश्नाचं उत्तर देखील अतिशय शांतपणे देतात.  


पालकांनी काय करावं? 


पालकांनी सुरुवातीला मुलांचा प्रश्न समजून घ्यावा. मुलांवर न रागवता त्यावर उत्तर द्यावं. 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी मुलांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. 
यामुळे मुलांना पालकांशी कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची सवय लागते 
मुलं सुरुवातीला कुणासमोरही, काहीही बोलू शकतात अशावेळी पालकांनी सज्ज राहावे. 
मुलांना बोलू द्या, मोकळं होऊ द्या. यामुळे मुलगा काय विचार करतो? याची देखील कल्पना येईल.
मुलांवर कधीच रागवू नये कारण एकदा राग आला तर किंवा भीती मनात निर्माण झाली तर ते तुमच्यापासून दूर जातात.