लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?
Hindu Marriage Rituals: मराठमोळ्या लग्नातील वधू वराच्या कपाळाला मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेली आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लग्नात मुंडावळ्या का बांधतात? या प्रथेमागील कारण जाणून आनंदाने ही परंपरा पुढच्या पिढीसोबत पुढे न्याल.
Hindu Marriage Rituals in Marathi : भारत हे विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक समाजाचे आणि जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक राज्याची आपली परंपरा आणि प्रथा आहे. लग्नाबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या आणि विशेष अशा परंपरा असतात. प्रत्येक प्रथेमागे कुठलं ना कुठलं कारण असतं. महाराष्ट्रीन लग्नातील विधीही खूप सुंदर असतात आणि त्या प्रत्येक प्रथेमागे सुंदर आणि महत्त्वाचं कारण असतं. लग्नातील या परंपरा मजा आणि रीतिरिवाज म्हणून नाही तर त्यामागे सुंदर अशी संकल्पना असते. या लग्नातील अशीच एक प्रथा म्हणजे वधू वरांच्या कपाळी असलेल्या मुंडावळ्या. (Why do brides groom bashing mudavalya in marriage What is scientific reason Marriage Rituals in marathi )
काही ठिकाणी बाशिंग बांधलं जातं. या मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधू वधू वर एकद सुंदर आणि देखणे दिसतात. हळदीच्या दिवशी वधू वराला मुंडावळ्या बांधल्या जातात. पूर्वी फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जायच्या. चला मग या मुंडावळ्या बांधण्यामागील कारण आपण जाणून घेऊयात.
मुंडावळ्या किवा बाशिंग बांधल्यानंतर वधू किंवा वराच्या रुपाकडे पटकन लक्ष न जातात मुंडावळ्या आणि बाशिंगकडे आपण आकर्षित होते. त्यामुळे वधू वराला नजर लागत नाही, असं म्हणतात.
दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लग्नात वधू वर एका वेगळ्या भावनेतून जात असतात. मुलीला आनंद आणि दु:ख असे दोन्ही भावनांचा खेळ सुरु असतो. त्यामुळे आधीच त्यांना ताण आलेला असतो. अशा स्थितीत डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बांधल्यास डोकं शांत ठेवण्यास मदत मिळते.
असे देखील म्हणतात की, जागरणामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी त्या विशिष्ट जागी मुंडावळी बांधल्यास त्यांना आराम मिळतो.
पूर्वीच्या काळात फुलांच्या मुंडावळ्या बांधण्याची परंपरा होती. कारण फुलांचा खास करुन मोगऱ्याचा सुंदर असा सुंगध आपलं मन प्रसन्न ठेवण्यास आणि आपलं डोकं शांत ठेवण्यास मदत करतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)