Health Benefits of Eating on Banana Leaf : सध्या भारतात खाद्यसंस्कृतीत (Food Culture) मोठं बदल झाले आहेत. पूर्वी भारतीय केळीच्या पानावर जेवण करायचे. खरं तर ही परंपरा आजही भारतातील साऊथ भागात म्हणजे केरळ, तामिळनाडू परिसरात गेल्यास पाहिला मिळते. दक्षिण भारतातली (South India) बहुतांश घरं आणि रेस्टॉरंटमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं, हे तुम्ही पाहिलं असणार आहे. तर आजही आपण देवांना नैवेद्य दाखवताना केळीच्या पानाचा वापर करतो. केळीचा पानाचा वापर अनेक जण अन्न शिजवतानाही करतात. पण तुम्ही कधी विचार केला का? की भारतीय केळीच्या पानावर का जेवतात? कारण जाणून तुम्हीदेखील दररोज नाही पण सणासुदीला केळीच्या पानावर जेवण्यास सुरुवात कराल. (Why do we Indians used to eat on Banana Leaves Traditional )


केळीच्या पानावर का जेवतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या काळात केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत कमी झाली असली तरी अनेक जण केळीच्या पानांचा उपयोग फॅशन (Fashion) किंवा लक्झरियस वाटावं म्हणून करताना दिसून येतात. केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे जाणून तुम्ही अवाक् व्हाल. जेव्हा या पानांवर आपण गरमागरम अन्न पदार्थ वाढतो, तेव्हा या पानांमध्ये असलेले पोषक आणि अँटीऑक्सिडंट (Antioxidant) घटक अन्नपदार्थात सामावले जातात, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे अन्नपदार्थ अधिक आरोग्यदायी होतं असं म्हटलं जातं. यासह केळीच्या पानांचे अनेक फायदे आहेत.


खरं तर केळीच्या पानावरील सूक्ष्म थर वितळतो जेव्हा गरम अन्न त्यावर ठेवले जाते आणि अन्नाद्वारे आपल्या शरीरात जाते. या प्रक्रियेमुळे अन्नाची चव तर वाढतेच पण पानातील पॉलिफेनॉलही शरीरात शोषले जातात. यामुळे आपलं आरोग्य (Health) चांगलं राहतं आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. यातील अँटीऑक्सिडंट तत्त्वं आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदतगार ठरतं. केळीच्या पानावर जेवल्यास पचनसंस्थेचे (Digestion System) विकार दूर होण्यास मदत मिळते.


पॉलीफेनॉल्स आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत कारण ते अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत आणि बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी पोटाचे विकार टाळण्यास मदत करतात.



केळीच्या पानांवर एक थर असून अन्न अधिक चविष्ट होतं, असं म्हणतात. जेव्हा गरम अन्नपदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात, तेव्हा हा थर वितळून अन्नात मिसळला गेल्यामुळे अन्न अधिक चविष्ट वाटतं.


जेव्हा आपण प्लास्टिक, स्टील किंवा अन्य धातूंच्या ताटात जेवतो, तेव्हा त्यातले रासायनिक (Chemical) घटक अन्नात मिसळले जाण्याचा धोका असतो. मात्र जेव्हा आपण केळीच्या पानावर जेवतो, तेव्हा असे रासायनिक घटक अन्नपदार्थात मिसळण्यापासून बचाव होतो. त्यामुळे आपला आहार हेल्दी राहतं.


प्लास्टिकच्या प्लेट्समुळे पर्यावरण प्रदूषित होतं हे तुम्ही मानता ना. मग केळीच्या पानांचा वापर पर्यावरणपूरक (Eco Friendly) ठरतो आणि पर्यावरण सुरक्षित असल्याने याचा वापर वाढत आहे. यानंतर तुम्ही पण केळीच्या पानावर किमान सणासुदीला तरी अन्न ग्रहण करा. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)