Relationship Tips : बदलत्या काळानुसार नातीही बदलत चालली आहे. प्रेमाला वय, जात आणि रंगाच बंधन नसतं. साधारण तरुणपणात एखादा मुलगा मुलगी प्रेमात पडतात आणि पुढे जाऊन लग्न करतात. पण गेल्या काही काळामध्ये अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये तरुण अविवाहित मुलं आपल्या पेक्षा मोठी आणि विवाहित स्त्रीकडे आकर्षित होत आहे. एवढंच नाही तर प्रेमातही पडत आहेत. बॉलिवूडमध्ये आपण असे अनेक रिअर लाइफ किस्से पाहिले आहेत.  (Why do young men fall in love with married women A relationship coach says that)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, तरुण मुलांना विवाहित स्त्रीमध्ये काय दिसतं. त्यांच्या आजूबाजूला सुंदर तरुण मुली असतात तरीदेखील त्यांना विवाहित स्त्री का आवडते. यामागील कारण कधी जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला का? आज रिलेशनशिप कोच आणि Predictions for Success चे संस्थापक विशाल भारद्वाज यांनी या कारणांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी यामागील कारण सांगितली आहेत.


...म्हणून अविवाहित तरुण विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतात!


अविवाहित मुलींपेक्षा विवाहित स्त्री या अधिक आत्मविश्वाने भरलेल्या असतात. घर, मुलं आणि ऑफिस ही तारेवरची कसरत त्या अगदी सहज सांभाळताना दिसतात. आयुष्यातील अनुभव आणि जबाबदारी त्यांना आत्मनिर्भर बनवते. त्यांच्यामधील हा आत्मविश्वास पाहूनच तरुण त्यांच्या प्रेमात पडतात. 


विवाहित स्त्री या काळजीवाहू स्वभावाच्या असल्याच दिसून येतात. कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी त्या स्वतःची, जोडीदाराची आणि घरातील इतर सर्व सदस्यांची काळजी अगदी नीट सांभाळतात. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची त्या नीट काळजी घेतात. तरुणांना काळजी करणाऱ्या आणि घेणाऱ्या सक्षम स्त्री आवडतात. 


विवाहित महिलांची समजूतदारपणा अधिक असल्याचेही पाहिला मिळतं. ती छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावत नाही. तर त्या उलट तरुण मुली साधा आणि छोट्या गोष्टीवरुन राग धरुन बसतात. विवाहित स्त्री या आयुष्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात. खरं तर त्या भावनिक आणि व्यावहारिक यांचा समतोल राखतात. त्याच्या वागणं बोलणामुळे तरुण प्रभावित होता. शिवाय विवाहित स्त्रिया विचारपूर्वक आणि अनुभवाने एखादी गोष्ट मांडतात त्यावर आपलं मत ठेवतात. 


विशाल भारद्वाज म्हणतात की, लग्नानंतर महिलांमध्ये अनेक हार्मोन्स बदल दिसून येतात. त्यांचा रंग उजळतो. त्या अधिक आनंदी आणि उत्साही दिसतात. तरुण मुलींपेक्षा विवाहित स्त्री अधिक आकर्षक दिसतात. त्यामुळे अविवाहित तरुण सहज त्यांच्याकडे ओढले जातात. 


विवाहित महिलांना नातेसंबंधांना महत्त्व कसे द्यावे हे सहज जमतं. लग्नानंतर प्रत्येक नात्यात गोडव्या टिकवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. कुटुंब हे त्यांचं प्राधान्य असतं आणि त्यांच्यासाठीचे निर्णय ते सहज घेताना दिसतात. वेळ प्रसंगी जोडीदाराचा ते मानसिक आधारही होतात. ते तरुण मुलांना खूप आवडतं.