gudi padwa 2024 in marathi : महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नवं वर्षाला गुढी उभारुन करण्यात येतं. या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं. यंदा उद्या म्हणजे 9 एप्रिलाला गुढी पाडवा सण साजरा केला जाणार आहे. या सणाचे स्वागत करण्यासाठी दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची पान आणि अशोकाची पान, फुलांची तोरणाची तयारी केली जाते. त्यानंतर गुढीला प्रसाद म्हणून कडुलिंब, गूळ, जिरे या पदार्थांपासून केलेले कडुलिंबाचा पाला खाण्यासाठी दिला जातो. नववर्षाच्या सुरुवातीला या पाल्याच्या रुपाने कडूच प्रसाद का दिला जातो? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते. या वातावरणातील बदलामुळे कांज्यासारखे आजार, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडू लिंबाचे सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आहे. यामागे काहीतरी कारण आहे, ते म्हणजे या काळात हवामान बदल होतो आणि हा बदल अनेक आजारसोबत घेऊन येतोय. कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. 


पारंपारिक आणि वैद्यकीय कारणं काय?


गुढी पाडव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यामागे पारंपारिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणेही आहेत. कडुलिंबाता पाला हा चवीला कडू असला तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात. ही वनस्पती मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो. 


वाढत्या उष्णतेमुळे त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते. तसेच खाज सुटणे ,पुरळ येणे यांसारख्या समस्या उन्हाळ्यात डोकं वर काढतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने पाण्यात टाकली जाते. कारण कोमट पाण्यातील कडुलिंबाची पाने ही रक्तशुद्धीकरणाचे काम करते. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन करण्याची परंपरा आपल्याकडे निर्माण झाली आहे. 


कडुलिंबाच्या पाणाची फायदे


उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता असते. मात्र कडुलिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते. कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. उष्णतेमुळो पोटाशी संबंधित विविध आजारांचे प्रमाण वाढते, कडुलिंब या आजाराला आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यास खूप मदत करते. तसेच हवामानातील बदलामुळे सांधेदुखी आणि मज्जातंतू दुखणे किंवा सूज यापासून आराम मिळण्यास मदत होते. कडुलिंबा पोटाची चरबी कमी करण्यात सर्वाधिक मदत होते. कडुनिंब हा केसातील कोंडा, केस गळणे, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादीपासून आराम मिळवून देण्यासाठी एक उत्तम आणि प्रभावी पर्याय आहे.


गुळाचे फायदे


बदलत्या वातावरणामध्ये आजारांचा धोका जास्त असताना गूळ खाल्लाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. गुळामुळे पचनक्रिया सुधारते. गूळ खाल्ल्यानंतर ॲसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता कमी असते. गुळामध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात.


अशी बनवा कडुलिंबाची चटणी


साहित्य : कडुलिंबाची पाने, 5 ते सहा मिरे, 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जीरे, 2 ते तीन चमचे डेसीकेटेड कोकनट किंवा बारीक किसलेले सुके खोबरे, थोडी चीच, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, चवीनुसार गुळ
कृती  : प्रथम कडुलिंबाची पाने घेवून ती स्वछ धुवून घ्यावी. सर्व साहित्य एकत्र करावे. मिक्सर चा भांडे घेवून त्यात कडुलिंबाची पाने घालावी तिखट मीठ जीरे धणे मिरे चिंच गूळ डेसिकेटेड कोकनट सर्व साहित्य घालावे व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. अशाप्रकारे कडुलिंबाची चटणी तयार.