Chankya Niti On Women: चाणक्य नीती हे आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले धोरणात्मक पुस्तक आहे. आयुष्य आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी नक्की काय करावे याविषयी त्यात अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. चाणक्य नीती धर्म, संस्कृती, न्याय, शांतता, चांगले शिक्षण आणि सर्वांगीण मानवी जीवनाच्या प्रगतीबद्दल सांगते. आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीला फॉलो करून आपण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकता. त्यांनी सांगितलेल्या धोरणांना फॉलो केल्याने जीवनात यश मिळण्याची शक्यता वाढते. आचार्य चाणक्यानेही आपल्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल बरेच काही सांगितले आहे. चाणक्यांनी  स्त्रियांच्या अशा अनेक गुणांबद्दल सांगितले ज्यामध्ये त्या पुरुषांच्याही पुढे आहेत.


पुरुषांपेक्षा महिला अधिक बुद्धिमान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्यांच्यामते स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. काही विशेष प्रसंगी, स्त्रियांची बुद्धिमत्ता अनेक प्रकारे पुरुषांपेक्षा चांगली कार्य करते. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त हुशार, समजूतदार आणि बुद्धिमान असतात.शिवाय त्या न घाबरता प्रत्येक समस्येला सामोरे जातात.


पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान


आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात लिहितात, 'सहसं षडगुणम' म्हणजे त्यांच्यात धैर्याची शक्ती पुरुषांपेक्षा 6 पटीने अधिक आहे. स्ट्रेस सहन करण्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात. 


पुरुषांपेक्षा महिला खाण्यात पुढे


आचार्यांनी लिहिले आहे की, 'स्त्रीनाम दिवगुण आहारो' म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुप्पट भूक लागते. त्याच्या मते पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त खातात. महिलांच्या शरीराची रचना अशी असते की त्यांना जास्त कॅलरीज लागतात. 


पुरुषांपेक्षा असतात जास्त काळजी घेणाऱ्या


आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप हळव्या मनाच्या असतात. शिवाय त्या त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या खूप जवळ असतात आणि त्यांची काळजी घेतात. महिला त्यांच्या  कुटुंबातील सदस्यांना सुख-दुःखात साथ देण्यात महिला आघाडीवर असतात. गरज पडल्यास महिला कुटुंबाचा संपूर्ण भार उचलू शकते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)