Google Search 2023 :  नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशातच 2023 या वर्षाला निरोप देताना या वर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं आहे, याच गुपित उघड केलं आहे. यावर्षी गुगलवर कोणाच्या रेसिपी सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये होत्या त्या जाणून तुम्हालाही नवलंच वाटेल. गेल्या वर्षी 3 नंबरला असलेली रेसिपी सेक्स ऑन द बीच यावर्षी दोन नंबरवर आहे. तर भारतीयांनी सर्वाधिक गुगलवर कसली रेसिपी शोधली हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर भारतीयांनी या वर्षी सर्वाधिक सर्च केलं आहे ते आंब्याचे लोणची रेसिपी. हो अगदी बरोबर. चला मग या वर्षी सर्वाधिक सर्च केल्या टॉप 10 रेसिपींची नावं पाहूयात. (Year Ender 2023 people searched for Sex on the Beach recipe video and Top 10 trending recipes from 2023)


भारतीयांनी 'या' रेसिपी सर्वाधिक सर्च केल्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) आंब्याचे लोणचे (Mango Pickle recipe)
२) सेक्स ऑन द बीच रेसिपी (Sex On The Beach recipe)
3) पंचामृत कृती (Panchamrit recipe)
4) हकुसाई कृती (Hakusai recipe)
५) धनिया पंजिरी रेसिपी (Dhaniya Panjiri recipe)
६) करंजी कृती (Karanji recipe)
7) तिरुवथिराई काली रेसिपी (Thiruvathirai Kali recipe)
8) उगाडी पचडी रेसिपी (Ugadi Pachadi recipe)
9) कोलुकट्टई कृती (Kolukattai recipe)
10) रवा लाडू कृती (Rava Ladoo recipe)


काय आहे Sex on the Beach ? 


पण तुम्हाला प्रश्न पडला आहेस की, हे सेक्स ऑन द बीच हे नेमकं आहे तरी काय? ही नक्कीच रेसिपी आहे का? हे नाव ऐकून डोळ्यासमोर बरच काही आलं असेल तर थांबा, ही हटके डिश एक ड्रिंक आहे. ही रेसिपी तुम्ही घरीही करु शकता. आज मॉकटेल (mocktail) आणि कॉकटेल (cocktail) असंख्य चाहते आहेत. अल्कोहोलिक ड्रिंक्ससोबत Sex on the Beach बनवली जाते. 
वोडकापासून तयार करण्यात येणाऱ्या Sex on the Beach मध्ये अनेक प्रकारच्या फ्रूट पंचचा (fruit punch) वापर करण्यात येतो. पीच श्नेप्स, ऑरेंज ज्यूस, क्रॅनबेरी ज्यूस, घालून एक रिफ्रेशिंग आणि चवीला एकदम भारी असं हे  Sex on the Beach तुम्ही घरीही तयार करु शकता. 


Sex on the Beach नावाची गंमत!


तुम्ही विचार करत असाल या ड्रिंकला हे नाव कसं पडलं. तर आम्ही तुम्हाला याची मजेदार स्टोरी सांगणार आहोत. 1987 मध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका हॉटेलचं प्रमोशनच्या वेळी बारटेंडरने हे ड्रिंक पहिल्यांदा बनवलं. हे हॉटेल होतं, फ्लोरिडा समुद्रकिनारी. तर फ्लोरिडातील लोकांना सर्वाधिक आवडतं ते म्हणजे बीच आणि त्यानंतर सेक्स (sex). त्यामुळे या हॉटेलच्या बारटेंडर या ड्रिंकचं नाव विचारल्यावर त्याने Sex on the Beach हे नावं ठेवलं. 


Sex on the Beach असं करा घरी तयार !


Sex on the Beach हे घरी बनवणं अगदी सोपं आहे. यासाठी 45 ml  वोडका , 30 मिली पीच सेनेत, 45  मिली ऑरेंज ज्यूस, 45  मिली क्रॅनबेरी ज्यूस एकत्र करा.



त्यानंतर त्यात बर्फ घालून व्यवस्थित शेक करु घ्या. एका मस्त छान अशा ग्लासमध्ये ही ड्रिंक सर्व्ह करा. या ड्रिंकला अधिक आकर्षित करण्यासाठी ग्लासवर संत्र्याची साल, डेकोरेटिव्ह अम्ब्रेला आणि चेरी लावून गार्निश करु शकता.