दर महिन्याला एकादशी साजरी केली जाते. पण योगिनी एकादशीचे खास महत्त्व सांगितले आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला 'योगिनी एकादशी' म्हटलं जातं. आजच्या दिवशी जर घरी बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा विचार करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी कोणतेही एक निवडू शकता.


येथे आम्ही तुम्हाला भगवान विष्णूच्या काही खास आणि सुंदर नावांबद्दल सांगत आहोत, ज्यामधून तुम्ही तुमच्या मुलासाठी तुमच्या आवडीनुसार नाव निवडू शकता.


धरेश: हे नाव भगवान विष्णूचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. धरेश म्हणजे पृथ्वीचा स्वामी.


ह्रदेव : हृदयाचा जो भाग असतो त्याला ह्रदेव म्हणतात. तुमचा मुलगा देखील तुमच्या हृदयाचा एक महत्त्वाचा भाग असेल, म्हणून हे नाव त्याला खूप अनुकूल होईल.


नमिश: 'ना' या अक्षरापासून सुरू होणाऱ्या या नावाचा अर्थ स्वतंत्र आणि दृढनिश्चयी असा होतो. तुमच्या बाळाचे नाव नमिष ठेवल्याने तुम्ही त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे गुण मिळवू शकता कारण असे म्हटले जाते की नावाचा आपल्या वागणुकीवर खूप प्रभाव पडतो.


श्रेयान आणि श्रेयांश : जर तुम्हाला जुळी मुलं असतील तर श्रेयान आणि श्रेयांश अशी त्यांची नावे ठेवा. ही दोन्ही नावे भगवान विष्णूच्या नावांवरुन घेण्यात आली आहेत. 


श्रीहान : श्रीहान या नावाचा अर्थ आहे सुंदर आणि मनमोहक. या नावाचा नक्की विचार करा. मुलाचं नाव घेताना सतत राहिल परमेश्वराचं स्मरण. 


धरेश : श्रीहरिचे वर्णन करताना धरेश या नावाचा उल्लेख होतो. पृथ्वीचा स्वामी असा या नावाचा अर्थ आहे. 


अश्रित :श्रीहरी को अश्रित म्हटलं जातं. राज्य करणारा राजा असा अश्रित या नावाचा अर्थ आहे. 


शुभांग : शुभांग हे श्रीहरि यांच्या सुंदर नावांपैकी एक नाव आहे. शुभांगचा अर्थ आहे सुंदर असं रुप. 


अचिंत्या : या नावाचा अर्थ असा आहे की जो अतुलनीय आणि अकल्पनीय आहे. भगवान विष्णूच्या उत्कृष्टतेच्या स्मरणार्थ त्यांना अचिंत्य असे नाव देण्यात आले आहे.


अच्युत: भगवान विष्णूच्या या नावाचा अर्थ असा आहे की ज्याचा नाश होऊ शकत नाही आणि जो अमर आहे. जर तुमच्या मुलाचे नाव 'अ' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव अच्युत ठेवू शकता.