Zakir Hussain Death Cause: भारतीय संगीत जगतातील महान कलाकार उस्ताद झाकिर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी गंभीर आजाराने निधन झाले. त्यांना काही काळापुर्वी प्रकृती बिघडल्यामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील एका हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. मिडीया रिपोर्टनुसार, उस्ताद झाकिर हुसेन हे हृदयरोगामुळे खूप काळापासुन त्रस्त होते. नुकतंच त्यांच्या हृदयातील वाहिन्यांमधील ब्लॉकेज मुळे 'स्टेंट' सुद्धा लावण्यात आले होते. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मिडीया समोर सांगितले की, "झाकिर हुसेन खुप काळापासुन 'बीपी' च्या समस्येचा सामना करत होते."


बीपी वाढल्यामुळे काय होते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हाय ब्लड प्रेशर'ची समस्या हृदयाला कमजोर बनवते. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. अशात हृदयविकाराचा झटका, 'हार्ट फेलियर' आणि स्ट्रोकची शक्यता अधिक वाढते.


 



कशामुळे होऊ शकते 'हार्ट ब्लॉकेज'?


 'हाय ब्लड प्रेशर'ला खुप काळापर्यंत दुर्लक्ष केल्याने 'हार्ट ब्लॉकेज'चा धोका वाढतो. खरंतर, 'हाय ब्लड प्रेशर' मुळे नसांवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे नसा आकसल्या जातात आणि रक्तस्त्राव योग्यरित्या होत नाही. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करुन हृदयात 'स्टेंट' घातले जातात.


हे ही वाचा: Zakir Hussain Health Update: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन - पीटीआय


किती जगतात बीपीचे रुग्ण?


 एका स्टडीनुसार, 'हाय ब्लड प्रेशर' असलेले रुग्ण सामान्य बीपी असलेल्या लोकांच्या तुलनेत कमी काळ जगतात. जास्त बीपी असलेल्या पुरुषांचे आयुर्मान सामान्य बीपी असलेल्या पुरुषांच्या तुलनेत 5.1 वर्ष कमी होते आणि हाय बीपी असलेल्या महिलांचे आयुर्मान सामान्य बीपी असलेल्या महिलांच्या तुलनेत 4.9 वर्ष कमी होते. हाय बीपी हृदयरोगाच्या गंभीरतेचे कारण ठरु शकते. 


संगीत जगतातील नामांकित तारा 


उस्ताद झाकिर हुसेन हे फक्त भारतीय संगीताचे दिग्गज कलाकार नाहित तर त्यांनी आपल्या कलेने संपुर्ण जगात भारतीय संगीताची नवीन ओळख करुन दिली. त्यांच्या तबला वादनाच्या कलेने केवळ भारतीयच नव्हे तर विदेशी संगीत प्रेमींच्या मनाला स्पर्श केला आहे.