झी मराठीवरील 'भागो मोहन प्यारे' मालिकेत भुताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सरिता मेहेंदळे जोशी नुकतीच आई झाली आहे. 2024 हे वर्ष सरितासाठी अतिशय खास आहे. अगदीच 1 जानेवारी 2024 रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सरिताने तिच्या बाळाचं नाव देखील जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक क्यूट फोटो शेअर केला. ज्यामध्ये सरिता तिचा पती आणि बाळाचा हात असा फोटो दिसत आहे. बाळाच्या हातावर गोड ब्रेसलेट आहे त्यावरुन त्याच्या नावाचा अंदाज येत आहे. “आमच्या आयुष्यातील नवीन प्रेम, आमचा छोटा चमत्कार…" आणि यापुढे तिने बाळाचं नाव आणि त्याचा अर्थही जाहीर केला आहे. 



अभिनेत्रीच्या मुलाचं नाव 


'अन्वित' असं सरिताच्या मुलाचं नाव. 'अन्वित' या नावाचा अर्थ आहे शौर्य आणि लीडरशिप असं लिहिलं आहे. "अ" अक्षरावरुन हे अतिशय गोड नाव आहे.  दरम्यान, सरिताला 1 जानेवारी 2024 रोजी मुलगा झाला. तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच कॅप्शनमध्ये बाळाच्या जन्माची तारीखही सांगितली होती.



 


'अ' अक्षरावरुन मुलांची नावे


अकलंक - लंक, डाग नसलेला


अग्रसेन - सेनेच्या अग्रभागी असणारा


अग्निमित्र - अग्निचा मित्र


अखिल - संपूर्ण


अगस्ति - सुप्रसिद्ध ऋषी


अग्रज - मोठा मुलगा


अखिलेंद्र - सर्व विश्वाचा स्वामी


अचल - स्थिर, पर्वत. दृढ राहणारा


अच्युत - कृष्णाचे एक नाव


अचलेंद्र - पर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव


अज - ईश्वर


अजातशत्रु - कुणीही शत्रू नसलेला


अजितेश - विजयी देव


अजेय - पराभव न पावणारा


अजय - ज्याला कुणीही हरवू शकत नाही असा


अतुल - अद्वितीय


अतीत - पलीकडला


मुलांची नावे आणि अर्थ 


आदित्य -  सूर्य, उगम, सुरुवात

अजय - अजिंक्य, विजयी

अमोल - अमूल्य, मोलवान

अनंत - अमर्याद, न संपणारी

अनंतनाथ -अनंताचे नाथ, भगवान शिव

अंकित - लिहिलेला, ठरवलेला

अक्षय - नष्ट न होणारा, नित्य

अरविंद - सूर्य, तेजस्वी