WTC Final, Day 3 Live Updates | न्यूझीलंडची सलामीची जोडी तंबूत, अश्विन आणि ईशांत शर्माने घेतल्या विकेट
India vs NZ, WTC Final, Day 3 Live Updates | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह अपडेट्स
साऊथम्पटन : India vs NZ, WTC Final, Day 3 Live Updates | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह अपडेट्स (icc world test championship final 2021 india vs new zealand live updates day 3 at southmpton in marathi) लाईव्ह स्कोअरकार्ड
Latest Updates
न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात
न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. याआधी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये सर्वबाद 217 धावा केल्या.
लंबू कायले जेमिन्सनचा 'पंच'
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सनन न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 21.1 ओव्हरमध्ये 47 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. जेमिन्सनन रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, रिषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला आऊट केलं.
विराटसेना पहिल्या डावात 217 धावांवर ऑलआऊट
टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाकडून पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 44 रन्स केल्या. आर अश्विनने मैदानात टिकण्याचा प्रयत्न केला. पण यात तो फार यशस्वी ठरला नाही. अश्विन 22 धावा करुन तंबूत परतला. न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सनने 21.1 ओव्हरमध्ये 47 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाला सातवा धक्का
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. आर अश्विन 27 चेंडूत 22 धावांची खेळी केली. .
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. मैदानात घट्ट पाय रोवून असलेला अजिंक्य रहाणे 49 धावांवर आऊट झाला आहे. रहाणे बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा 6 बाद 182 असा स्कोअर झाला आहे. रहाणेनंतर आर अश्विन मैदानात आला आहे.
टीम इंडियाने रिषभ पंतच्या रुपात पाचवी विकेट गमावली आहे. पंतने 4 धावा केल्या. पंत आऊट झाल्याने टीम इंडियाची 156-5 अशी स्थिती झाली आहे.
टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवसाची खराब सुरुवात झाली आहे. भारताला मोठा झटका बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 44 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानात खेळत आहेत.
सत्रनिहाय खेळ
पहिले सत्र : 3.30 ते संध्याकाळी 5.30pm
दुसरे सत्र : संध्याकाळी 6.10 पासून रात्री 8.25 पर्यंत
थर्ड सेशन : रात्री 8.45 पासून ते रात्री 11 पर्यंत
तसेच वातावरण स्वच्छ राहिल्यास शेवटच्या सत्रातील खेळ अर्धा तास अधिक खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फिल्ड अंपायर्सनी साऊथम्पटनच्या खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच साडे तीन वाजता सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला उशीरा सुरुवात होणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना वेळेवर सुरु होणार नाही.
तिसऱ्या दिवसाच्या खेळालाही उशीरा सुरुवात होणार आहे. ट्विटद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.