Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या
Latest Maharashtra News : Marathi Live News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स
Latest Updates
मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू
Mumbai Measles: मुंबईत(Mumbai) गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू, मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली अकरावर. मुंबईत सध्या गोवर रुग्णांची संख्या पोहचली 220 वर.
बातमीची लिंक- https://bit.ly/3Vo4IrD
बोरिवलीत डान्सबारमध्ये छमछम सुरूच?
Dance bar in Borivali?: बोरिवलीमध्ये(Borivali) डान्सबारमधली छमछम सुरूच आहे, असं दिसतंय. मनसे नेते नयन कदम(Nayan Kadam) यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओच ट्विट केलाय आणि या डान्सबारसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवालही विचारलाय. डान्स बारचा हा व्हिडिओ समोर आल्यानं पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या कस्तुरबा मार्गातील पार्कसाईट 14 ते 15 बार अवैधपणे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचा मनसे नेते नयन कदम यांचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये दारू पिऊन झिंगलेले काही तरुण नृत्य करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करत असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तेरा बार तोडले आता आम्हीही बोरिवलीत बार तोडावेत का?, असा सवाल नयन कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3EvKaGF
12 वी नंतरच्या ग्रॅज्युएशनसाठी चार वर्षे लागणार
UGC New Rule for graduation: पुढील शैक्षणिक वर्ष अर्थात 2023-24पासून ग्रॅज्युएशनसाठी नवा नियम लागू होतोय. 12 वीनंतर डिग्रीसाठी आता 4 वर्ष लागणार आहे. यूजीसीनं हा मोठा निर्णय़ जाहीर केलाय. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 12 वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी चार वर्षे लागणार आहेत. याबाबतचा महत्त्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतलाय. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये 45 केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. तर अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झालीयत.
बातमीची लिंक- https://bit.ly/3OqcBdL
राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका
Petition for removal of Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींना(Koshyari) पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल. राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता भंग केल्याचा याचिकेत आरोप. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा राज्यपालांनी अवमान केल्याचा याचिकेत ठपका. कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते दाखल केली आहे याचिका. मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली याचिका. लवकरच सदर याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता.
बातमीची लिंक- https://bit.ly/3VeDyDX
हार्ट ऑपरेशनसाठीचे स्टेंट होणार स्वस्त
Stents for heart surgery will be cheaper: हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटच्या(stent) किंमती लवकरच कमी होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जीवनावश्यक औषधांच्या यादीत स्टेंटचा समावेश केलाय. केंद्र सरकारनं हा मोठा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं हार्ट ऑपरेशनमध्ये वापरलं जाणार स्टेंट स्वस्त होणाराय.भारतीय कायद्यानुसार स्टेंट हे औषध-नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येते. ते जीवरक्षक असल्याने त्याचा समावेश आवश्यक औषधांच्या यादीत करून त्यांच्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होती. सरकारच्या निर्णयानंतर आता स्टेंटच्या किमती लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केलंय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3GCD0Ty
अर्जेंटिनाचा सलामीच्या लढतीतच पराभव
FIFA 2022 Argentina Vs Saudi Arabia: फिफा वर्ल्डकपमधला पहिला धक्कादायक निकाल, अर्जेंटिनाचा (Argentina) सौदी अरेबियाने (Saudi Arabia) केला 2-1नं पराभव. अर्जेंटिनाला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का, अर्जेंटिनाकडून एकमेव गोल मेस्सीकडूनच. एका गोलने पिछाडीनंतर सौदी अरेबियाने 2-1 ने मिळवला विजय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3i32mzY
पुण्यात रिक्षाचालकांचा संप
Pune Auto Rikshaw Strick: पुण्यात 28 नोव्हेंबरपासून ऑटो रिक्षाचा बेमुदत संप. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षाचालक आक्रमक. बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून 28 नोव्हेंबरपासून पुण्यासह(Pune) पिंपरी चिंचवडमध्ये(Pimpri-Chinchwad) रिक्षचालकांचं "रिक्षा बेमुदत बंद" आंदोलन. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार. 50 ते 60 हजार रिक्षाचालक होणार संपात सहभागी. अनेकवेळा निवेदन देऊन सुध्दा सरकार ऐकत नसल्याने रिक्षाचालकांच बेमुदत बंद, मागण्या मान्य होईपर्यंत रिक्षा सुरू करणार नाही, रिक्षाचालकांची माहिती.
बातमीची लिंक- https://bit.ly/3V0gngc
'POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार'
Indian Army ready for operation in POK: 'भारतीय सेना POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार', नॉदर्न कमांडचे GOC लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान. POKमध्ये कारवाई करण्यासाठी सेना सज्ज, फक्त सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय असं उपेंद्र द्विवेदी यांचं विधान.
बातमीची लिंक- https://bit.ly/3tTz0GV
नागपुरातील गांजाचं ओडिशा कनेक्शन
Nagpur Drugs Racket : नागपुरातील कापसी भागात जप्त करण्यात आलेल्या गांजा रॅकेटचा (Drugs Racket Expose) पोलिसांनी पर्दाफाश केलाय.. यातील मुख्य तस्कराला पोलिसांनी तेलंगणातून (Telangana) अटक केलीये..बाबुराव कामापर्थी असं या गांजा तस्कराचं नाव आहे... तो ओडिशातील (Odisha) गांजा नागपूरमार्गे मराठवाड्यात पाठवत होता.. यासाठी तो सेंद्रीय खतांच्या गोण्यांचा वापर करायचा... नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केलेल्या कारवाईत त्याच्याकडून ट्रक भरुन गांजा जप्त केलाय.. या गांजाची बाजारातील किंमत 2 कोटी 33 लाखांच्या घरात आहे.
टीम इंडियाचं टी-20 सीरिज जिंकण्याचं लक्ष्य
India vs New Zealand 3rd T-20 : न्यूझीलंडनं अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियासमोर 161 रन्सचं टार्गेट ठेवलंय. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) 3 विकेट्स घेत किवींची इनिंग रोखली. न्यूझीलंडनं (New Zealand) प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 160 रन्सपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडतर्फे डिवॉन कॉन्वे (Devon Conway) 59 तर ग्लेन फिलिप्सनं (Glenn Phillips) 54 रन्सची खेळी केलीय.. न्यूझीलंडचे इतर बॅटर टीम इंडियासमोर ढेपाळले. आजची मॅच जिंकून सीरिज जिंकण्याची टीम इंडियाकडे (Team India) संधी आहे.
सेक्सटॉर्शन रॅकेटचा मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सांगितला अटकेचा थरार.
Pune Sextortion Racket : ऑनलाईन सेक्सटॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दत्तवाडी पोलिसांनी या सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश केलाय. राजस्थानचं (Rajasthan) गुरुकोठडी गावाचा या संपूर्ण सेक्सटॉर्शनमध्ये समावेश असल्याचं समोर आलंय. आरोपींना पकडायला पोलीस वेशांतर करुन गावात पोहोचले.. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक (Stone Pelting On Police) करण्यात आली. पोलिसांनी जीवावर उदार होत तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या (MasterMind Arrest) आवळल्या... झारखंडमधल्या जमतारा गावासारखीच राजस्थानच्या या गावातल्या तरुणांना ऑनलाईन सेक्सटॉर्शनचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पीडित लोकांना न्यूड फोटो पाठवून मग ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरु व्हायचा... 28 डिसेंबरला पुण्याच्या दत्तवाडी परिसरात सेक्सटॉर्सनला बळी पडलेल्या एका युवकानं आत्महत्या केली होती.
बातमी पाहा - ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दाऊदच्या हस्तकांकडून हल्ल्याचा कट असल्याचा मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज
Prime Minister Narendra Modi Therat Message : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय...मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या (Mumbai RTO) नंबरवर 7 ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय...अंडरवर्ल्ड दाऊदचे (Dawood Ibrahim) हस्तक मोदींवर (Narendra Modi) हल्ला करणार असल्याचा धमकी देणा-याने दावा केलाय...मुस्तफा अहमद आणि नवाज अशी धमकी देणा-या व्यक्तीने नाव सांगितलीयत...तपासात धमकी देणा-याची ओळख पटली असून तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आलंय...ऑडिओ क्लिपसोबत इतरही काही कागदपत्र पाठवले होते...त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जातेय...धमकी देणारा हा बिस्मा डायमंड कंपनीत दोन वर्षापूर्वी कामाला होता...त्याला कामावरून कमी केल्याची माहिती आहे...
बातमी पाहा - नरेंद्र मोदींना कोणी दिलीय जीवे मारण्याची धमकी?; घ्या जाणून
रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची साकेत कोर्टात कबुली.
Shraddha Walkar Murder Update : आफताबने दिल्लीच्या साकेत कोर्टात धक्कादायक कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची (Delhi Crime News) हत्या केल्याचं आफताबनं न्यायमूर्तींसमोर कबूल केलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे आफताबला (Aftab) आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं, तेव्हा त्याने ही कबुली दिलीय. दरम्यान आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आलीय. आफताबची आता पॉलीग्राफ टेस्टही (Polygarph test) केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांना त्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. आफताब चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तर चुकीची देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट केली (Narco Test) जाणार आहे. पण पॉलिग्राफ झाल्यानंतरच नार्को टेस्ट करण्यात येते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी मागितली होती.
बातमी पाहा - होय! मीच ठार केलं; Shradha Walkar ला जीवे मारणाऱ्या क्रूरकर्मा आफताबची न्यायालयात कबुली
राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?
Maharashtra Political News : राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचे संकेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (raosaheb danve) दिलेयत...मविआ सरकार (MVA Government) जाईल असं कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले...यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही...सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलीय...त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलाय...तर शिंदे फडणवीस सरकार 100 टक्के (Shinde-Fadanvis Government) पडणारच असं राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलंय...त्यामुळे राज्यात मध्यावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...
बातमी पाहा - राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? रावसाहेब दानवे काय म्हणाले?
इराणमधील हिजाबवादाचे कतार फिफा वर्ल्ड कपमध्ये पडसाद
Iran HIjab controversy : इराणमधल्या हिजाबविरोधी आंदोलनाची धग कतारमधल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये (Qatar Fifa World Cup 2022) पोहोचलीय. इराण विरुद्ध इंग्लंड मॅच (Iran vs England Match) सुरु होण्याआधीच चर्चेत राहिली. कारण इराणच्या फुटबॉल टीमने (Iran Football Team) आपल्याच देशाचं राष्ट्रगीत (Iran National Anthem) म्हणण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत हे खेळाडू शांतपणे उभे राहिले आणि इराण सरकारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा दाखवला.. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात (Iran HIjab controversy) आंदोलन सुरु आहे. त्यातच आता फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.
बातमी पाहा - राष्ट्रगीतावेळी इराणी खेळाडूंची 'ती' कृती चर्चेत; सरकारच्या 'या' गोष्टीला दर्शवला विरोध
पुण्यात गुंडांची दहशत, दुकांनाची तोडफोड करत पैशांची मागणी
Pune Gang Terror : मुंढवा (Mundhwa) केशवनगर भागात गुंडांनी दहशत माजवलीये. काही गुंडांनी धारदार शस्त्र (Goon Terror) घेवून दुकान फोडलंय. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे गाड्यांची तोडफोड (Vandalism of vehicles) करण्यात आली. नागरिकांना धमकी देवून पैशाची मागणीही करण्यात आली. रात्रीच्या सुमारास ह्या गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झालीये. गुंडांवर कडक कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेनं दिलाय.
बातमी पाहा - पुण्यात गुंडांची दहशत; दुकानांची तोडफोड करत पैशांची मागणी; पाहा व्हिडिओ
नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक
Pune Navale Bridge Accident Update : पुण्यातील नवले पुल अपघातातील कंटेनर चालकाला (Container Driver Arrest) सिंहगड पोलिसांनी अटक केलीय...मनीराम यादव (Maniram Yadav) असं कंटेनर चालकांचं नाव आहे...आरोपी मनीरामने उताराला कंटेनर बंद करून चालवल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचं समोर आलंय...या अपघातात 48 गाड्यांना कंटेनरने धडक दिली...यात सुमारे 40 ते 50 जण (40 to 50 People Injured)जखमी झाले...तर गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय...या घटनेनंतर आरोपी चालक फरार झाला होता...पण, त्याला चाकणच्या नाणेकरवाडीतून पोलिसांनी अटक केलीय...
बातमी पाहा - नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक
मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिकमध्ये गोवरचा धोका.
Measles Outbreak : मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढलाय. नाशिकमध्ये गोवरचे 4 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडालीय. संशयित चार बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या लॅबमध्ये पाठविलेत.
लहान बालकांची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झालाय.राज्यभरात हाडं गोठवणारी थंडी
Maharashtra Cold Wave : राज्यभरात गारठा (Cold Wave) वाढलाय. सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी घट झाली असून, पुण्यात (Pune) दहा वर्षांतील सर्वाधिक थंडी पडलीय. तर जळगावात (Jalgaon) नीचांकी 8.2 अंश सेल्सिअस तापमान आहे...मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidharba) तापमानातील मोठी घट झालीय...मुंबईसह कोकण विभागातही (Mumbai And Konkan Cold Wave) थंडीचा कडाका पडला असून, राज्यभरात हाडं गोठवणारी थंडी पडलीय...
बातमी पाहा - राज्यभरात थंडीचा कडाका वाढला! कोणत्या जिल्ह्यांचा किती पारा?
इंडोनेशियात भूकंपामुळं 162 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी
Indonesia Earthquake : इंडोनेशियातील जावा बेट भूकंपानं (Earthquake) हादरलंय...5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्याने 162 जणांचा मृत्यू (162 deaths) झालाय...तर 700 पेक्षा अधिक लोक (700 people injured) जखमी झालेयत...भूकंपाच्या धक्क्याने हजारो घरं कोसळलीयत...भूकंपामुळे मोठी हानी झाली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत...
बातमी पाहा - अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारं
अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर आज हातोडा?
Kirit Somaiya on Anil Parab (Maharashtra Political News Live) : रत्नागिरीत दापोलीतल्या साई रिसॉर्टवर (Sai Resort) कारवाईसंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्विट करून माहिती दिलीय. दापोली साई रिसॉर्टवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय...यासाठी सकाळी 10 वाजता दापोली पोलीस स्टेशनला सोमय्या जाणार आहेत...त्यामुळे आजच साई रिसॉर्टवर हातोडा पडणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा - अनिल परब याच्या साई रिसॉर्टवर कारवाई होणार? किरीट सोमय्या काय केलं ट्विट?
6 महिन्यांच्या बालकांना गोवरची लस देण्याची शक्यता
Measles Outbreak : मुंबईसह राज्यातल्या विविध भागात गोवरचा (Measles Outbreak) उद्रेक पाहायला मिळतोय. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अॅक्शन मोडवर आलंय. सहा महिन्यांच्या बालकांनाही आता गोवरची लस (Measles Vaccine) देण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government) करतंय. सध्या गोवरची लस देण्याची वयोमर्यादा ही 9 महिने आहे. पण ती 3 महिन्यांनी कमी करुन सहा महिन्यांपर्यंत आणण्याचा विचार सुरु आहे. शून्य ते नऊ महिन्यांच्या आतल्या म्हणजे लसीकरण न झालेल्या बालकांना संसर्ग होत असल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिलीय.
बातमी पाहा - गोवरचा उद्रेक! सहा महिन्यांच्या बालकांनाही गोवरची लस?; भारती पवारांची माहिती
लहान मुलांप्रमाणे वृद्धांना गोवरचा धोका
Measles Outbreak in Mumbai : गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. 18 वर्षांवरील दोन संशयित रुग्ण आढळून आलेत. लहान मुलांप्रमाणेच 70 वर्षांवरील ज्येष्ठांनाही (Senior Citizen) गोवरची लागण होण्याची शक्यता निर्माण झालीय. बालकांचं लसीकरण सुरूय. मात्र वयोवृद्ध व्यक्तींना सध्या तरी कुठलीही लस देण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. वृद्धांना मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाब (Blood pressure) असल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. मुंबईतील गोवरचा वाढता धोका लक्षात घेता ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झालीय.
संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, तरुणीसुद्धा गंभीर जखमी..
Sambhajinagar Burn : संभाजीनगरात (Sambhajinagar) प्रेम प्रकरणातून स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. प्रियकरानं प्रेयसीला जाळल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला होता. 50 टक्के भाजलेल्या तरुणीवर उपचार सुरू आहे...मृत गजानन मुंडे (Gajanan Munde) हा तरुण संभाजीनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता. त्याचं तरुणीवर प्रेम होतं. पण, तरुणीनं लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तरुणीला पेटवलं आणि स्वत:लाही पेटवून घेतलं...आणि नंतर तरुणीला मिठी (Boy Burnt Himself and Hugged Girls) मारली. त्यामध्ये तरुणीही 50% भाजलीय. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत...पण, जळीत प्रकरणात मृत गजानन मुंडेच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल झालाय...आई वडिलांनी लग्न करण्यासाठी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब तरुणीनं दिलाय...यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमी पाहा - संभाजीनगरमधील जळीत प्रकरणातील तरुणाचा मृत्यू! तरुणीची स्थिती कशी?
टीम इंडियाचं टी-20 सीरिज जिंकण्याचं लक्ष्य
India vs New Zealand 3rd T-20 : नेपियरमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटची टी-20 मॅच रंगणार आहे. दुसऱ्या टी-20मध्ये सूर्यकुमार यादवची तडाखेबंद बॅटिंग आणि त्यानंतर दीपक हुडाच्या बॉलिंगसमोर न्यूझीलंडची (New Zealand) दाणादाण उडाली होती. सध्या टीम इंडिया सीरिजमध्ये (Team India) 1-0 नं आघाडीवर आहे.. दुसरीकडे न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) शेवटच्या आजच्या टी-20 मॅचला मुकणार आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडचं नेतृत्व करेल.. त्यामुळं आजची मॅच जिंकून सीरिज जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल.. तर आजची मॅच जिंकून सीरिज बरोबरीत करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.