LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

Sat, 11 Mar 2017-12:25 pm,

पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

पंजाब : पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

Latest Updates

  • पंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण करून धर्माला विजयी केलं आहेः नवज्योतसिंग सिद्धूंचा अकाली दल- भाजपवर निशाणा

  • काँग्रेस नेते अमरिंदरसिंग यांचा दणदणीत विजय; अकाली दलाचे उमेदवार जनरल जे जे सिंग यांचं डिपॉझिट जप्त

  • चंदीगड : पंजाबमध्ये दोन जागांवर काँग्रेसला विजय 

  • चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेस ७३ जागांवर आघाडीवर

  • पंजाबमधील ताजे अपडेट : काँग्रेसला ६०हून अधिक जागांवर आघाडी... अकाली दल-भाजपला २९ जागांवर आघाडी, तर आप २५ जागांवर पुढे...

  • अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू आघाडीवर 

  • पंजाबमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला ५५ जागांवर आघाडी

  • पंजाबमधील ताजे कलः काँग्रेस - ५१, अकाली-भाजप - २७, आप - २४, इतर - १

  • पंजाबमध्ये अकाली दल -भाजपला २७ जागांवर आघाडी

  • पंजाबमध्ये काँग्रेसला विजयी आघाडी

  • पंजाबमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, काँग्रेस २७ जागांवर आघाडी

  • पंजाबमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल

  • पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जोरदार मुसंडी, १६ जागांवर काँग्रेसला आघाडी

  • पंजाबः काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग ३५०० मतांनी आघाडीवर

  • पंजाबः आम आदमी पार्टीचे 'स्टार' उमेदवार भगवंत मान आघाडीवर

  • पंजाबमध्ये काँग्रेस पाच जागांवर आघाडी, पटियालामधून अमरिंदर सिंग आघाडीवर, आपचेही तीन जागांवर तर अकाली दलही तीन जागांवर आघाडीवर

  • पंजाबमध्ये आप, अकाली दल आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

  • पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आघाडीवर, लांबी मतदारसंघातून बादल आघाडीवर

  • पंजाबमधील कल काँग्रेसच्या बाजूने... १४ पैकी १० जागांवर काँग्रेस पुढे... अकाली दल-भाजप २ जागांवर, तर आप २ जागांवर आघाडीवर...

  • चंदीगड : प्रकाशसिंह बादल आघाडीवर

  • चंदीगड : पंजाबमध्ये तीन जागांचे कल हाती, तीनही जागांवर काँग्रेस आघाडीवर

  • पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात, ५४ केंद्रांवर मतमोजणी सुरु

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link