Narendra Modi LIVE Updates: `गोसेखुर्द` प्रकल्पावरुन विरोधकांवर टीका

Sun, 11 Dec 2022-12:54 pm,

Maharashtra Samruddhi Mahamarg Inaugration LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या ( Mumbai- Nagpur Expressway ) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

Maharashtra Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा  झेंडा दाखवतील.

Latest Updates

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : असंवेदनशील सरकारमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला, गोसेखुर्द प्रकल्पावरुन पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उघडणार आहे  - मोदी 

    राज्याच्या विकासात राजकारण आणू नये - मोदी 

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  समृद्धीमुळे 24 जिल्हे एकमेकांना जुळून आहेत. महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं म्हणतं शिंदे आणि फडणवीस यांचं मोदी यांनी कौतुक केलं. 

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल.  डबल इंजिन सरकार वेगाने काम करतं आहे - मोदी

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. टेकडीच्या गणपतीला वंदन करुन भाषणाला सुरुवात. आज महाराष्ट्राला 11 प्रकल्प मिळाले असं मोदी यावेळी म्हणाले. 

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : 'शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वात महामार्ग पूर्ण'
    समृद्धी प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाचा - गडकरी

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : 'शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वात महामार्ग पूर्ण'
    समृद्धी प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाचा - गडकरी

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : 'शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वात महामार्ग पूर्ण'
    समृद्धी प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाचा - गडकरी

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : 'शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वात महामार्ग पूर्ण'
    समृद्धी प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाचा - गडकरी

  • Mumbai-Nagpur Samruddhi Expressway LIVE : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवणार्‍या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.  मोदींमुळेच समृद्धी महामार्ग शक्य झाला, या शब्दात देवेंद्र फडवणीस यांनी मोदींचे आभार मानले. 

  • Narendra Modi LIVE Updates : AIIMS चं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे.'महा समृद्धी' म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे  लोकार्पण. नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. मोदी 10 किलोमीटर समृद्धी महामार्गावर सफर 

  • Samruddhi Mahamarg Inaugration LIVE :  समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे.मोदी समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास करणार असून त्यानंतर 'महा समृद्धी' म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण. 

  • Narendra Modi LIVE Updates : नागपूर मेट्रो फेज 2 चं पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. नागपूरकरांना मेट्रोचं गिफ्ट

  • Narendra Modi LIVE Updates : नागपूर मेट्रो फेज 1 चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.  फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी दरम्यान मोदींनी मेट्रोची सफर केली. या सफरदरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

  • Narendra Modi LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनला दाखल झाले आहे. मोदी मेट्रो प्रदर्शनाची पाहणी आणि नंतर मेट्रोची सफर करणार आहेत. याच मेट्रोने ते 10.20 ला खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. खापरी इथे ते मेट्रोच्या दोन मार्गांंचं लोकार्पण करतील.

  • Narendra Modi LIVE Updates : मोदींचा 'समृद्धी दौरा' ! पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेल्वे स्टेशनवर जाऊन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी उपस्थित होते. 

  • Narendra Modi LIVE Updates : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे होणार वेळ आणि इंधनाची बचत... लिहू या यशाची नवी परिभाषा, महाराष्ट्राची समृद्धीची भाग्यरेषा. या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. 

  • Narendra Modi LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूर विमानतळावर आगमन झालं आहे.

  • Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत.  सकाळी 9.25 वाजता मोदी यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर 9.40 वाजता ते नागपूर रेल्वे स्ठानकाला भेट देतील. तिथे 9.45 ते 9.55 वाजता वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. सकाळी 10 वाजता फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनला भेट देतील. 10.10 वाजता मेट्रो प्रदर्शनाची पाहणी आणि नंतर मेट्रोची सफर करतील. याच मेट्रोने ते 10.20 ला खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. खापरी इथे ते मेट्रोच्या दोन मार्गांंचं लोकार्पण करतील. त्यानंतर 10.45 ला समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन होणार.  10.45 ते 11.00 दरम्यान समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास आणि नंतर मगामार्गाचे लोकार्पण होणार.  पुढे 11 वाजता रस्ते मार्गाने मिहान प्रकल्पाकडे प्रस्थान होणार. 11.15 ते 11.25 या वेळेत मिहान एम्सचे औपचारिक उद्घाटन करणार. साधारण 11.30 वाजता टेम्पल ग्राऊंड एम्स सार्वजनिक कार्यक्रम आणि नव्या प्रकल्पाचं उद्घाटन करणार. दुपारी 12.35 वाजता नागपूर विमानतळाकडे प्रस्थान करणार आणि 12.55 वाजता नागपूरहून गोव्यासाठी रवाना होणार. 

  • Mumbai-Nagpur Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किमी आहे.  त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा एक्स्प्रेस वे लोकांसाठी खुला होणार आहे. उर्वरित मार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.  प्रकल्पात किमान 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडली जाणार आहेत. 6 लेनचा महामार्ग असून गरज भासल्यास 8 लेनपर्यंत वाढवता येऊ शकतो. या महामार्गावर 26 टोल टॅक्स काउंटर आहेत. या महामार्गासाठी अंदाजे खर्च 55000 कोटी इतका झाला आहे. या महामार्गावर वैद्यकीय सुविधा असून 108 क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध आहे. तर 15 रुग्णवाहिका, 15 जलद प्रतिसाद वाहने, 13 गस्ती वाहने कायम तैनात असणार आहेत. 

  • Mumbai-Nagpur Samruddhi Expressway या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाची आखणी केलीय. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. 

  • Mumbai-Nagpur Samruddhi Expressway या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) असं नाव देण्यात आलं आहे. आज मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी (Nagpur - Shirdi) या रस्त्याचे लोकापर्ण होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.  त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

  • मुंबई (Mumbai) आणि नागपूरचं (Nagpur) अंतर आता 7 तासांवर येणार आहे कारण समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून आज पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

  • Narendra Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत आहे. राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link