Marathi Updated News Videos | दिवसभरातील अपडेट मराठी बातम्या आणि व्हीडिओ
दिवसभरातील अपडेट मराठी बातम्या आणि व्हीडिओ तसेच मराठीतून ब्रेकिंग न्यूज तुम्हाला येथे वाचायला मिळतील..
दिवसभरातील अपडेट मराठी बातम्या आणि व्हीडिओ तसेच मराठीतून ब्रेकिंग न्यूज तुम्हाला येथे वाचायला मिळतील..
अपडेट बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा
Latest Updates
नालासोपाऱ्यात नायजेरियन ड्रॅग पेडलरला अटक...
तुळींज पोलिस नायजेरियन नागरिकांविरोधात आक्रमक
प्रथमेश तावडे, झी २४ तास, नालासोपारा : नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात कारवाईची मोहिम सुरू ठेवली असून आज एका नायजेरियन ड्रॅग पेडलरला अटक करण्यात यश मिळविले आहे. ओगबोना विक्टर असं त्याचे नाव असून त्याकडून पोलिसांनी विक्री करिता बाळगलेले १०० ग्राम कोकीन जप्त केले आले.
तुळींज पोलिसांकडून दोन दिवसांपासून नायजेरियन नागरिकांची वस्ती असलेला प्रगतीनगर परिसरात झाडाझडती घेतली जात आहे.. त्यात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने विक्री करीता बाळगलेले कोकीन कुठून आणले व ते कोणाला विकले जाणार होते ?. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
मुंबईमध्ये दुकानात सिनेस्टाईल पाठलाग करत ८ कोटी रुपयांची चोरी
प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : कमी वेळेत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना चोरीच्या गुन्ह्यात जेल मध्ये जावे लागले आहे , चित्रपटातील कथानकाला शोभेल असा तपास करत आरोपीना अटक केली असून 90 टक्के मालमत्ता जप्त केली आहे ...
पोलीस स्टेशन च्या समोर बुरखा घालून बसलेले हे तरुण गुन्हेगार आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही कमी वेळेत श्रीमंत होण्याच्या नादात हे गुन्हेगार झाले आहेत त्यांनी एका ज्वेलर्स च्या दुकानातून 8 करोड पेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आणि पोबारा केला तो अगदी चित्रपटात शोभेल असा .
डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुलेश्वर येथील जेनिशा ज्वेलर्स च्या मालकांचे खुशाल टामका यांच्या वडीलांच्या मृत्यू मुळे ते दुकानात येत नव्हते , मात्र त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या गणेश हिराराम कुमार वर विश्वास असंल्याने त्याला दुकानाची चावी दिली होती. रोज रोज करून पैसे कमवायचे असे किती दिवस चालणार हा विचार गणेश च्या मनात आला आणि त्याने आपल्या मित्रांच्या समवेत कट आखला.
12 तारखेला एक्झिबिशन साठी दुकानात मोठ्या प्रमाणात सोने येणार होते याचा मागोवा लागल्यावर त्यांनी प्लान केला आणि 14 तारखेला चोरी करून पोबारा केला जाताना त्यांनी 17 किलो पेक्षा जास्त सोने आणि रोख रक्कम असा सुमारे 8 कोटींचा माल चोरला आणि दुकानातील सी सी टी व्ही आणि डीव्हीआर सह पोबारा केला
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला , दुकानात सी सी टीव्ही उपलब्ध नसल्याने इतर मार्गाने तपास सुरू केला त्यात आरोपी बोरिवली पर्यंत ओला गाडीने आणि पुढे खाजगी गाडीने गेल्याचे निष्पन्न झाले यावर पोलिसांनी शोध घेत रमेश प्रजापति ला ताब्यात घेतले आणि शेतात लपवून ठेवलेले 9 किलो सोने जप्त करत इतर आरोपीनाचा पाठलाग केला , या प्रकरणात राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून एकून 12 आरोपी पैकी 10 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून 7 कोटी पेक्षा जास्त मालमत्ता हस्तगत केली आहे .
टिपू सुलतानविषयी वक्तव्य - सोलापुरात फडणवीसांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
सोलापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान विषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात चांगलंच रान पेटलंय, सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, टिपू सुलतान चौकात देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंय.
टिपू सुलतान विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने एमआयएम च्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्याने आज एमआयएम कडून हे आंदोनल करण्यात आले.
12 आमदार निलंबन रद्द आणि किराणा दुकानात वाईन विक्रीवर काय म्हणाले वळसे पाटील
अहमदनगर : 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्याची न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप माझ्या हाती आलेली नाही... निकाल पाहिल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. मात्र, विधान मंडळामध्ये घेतलेले निर्णय शक्यतो न्यायालयात जाऊ नये आणि न्यायालयाने देखील त्याची दखल किती घ्यायची याबाबत काही गाईड लाईन आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल मात्र, यावर आता विधिमंडळ काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल असंही वळसे पाटील म्हणाले.
सोबतच किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजपकडून सरकारवर टीका होत आहे, मात्र प्रत्येक किराणा दुकानातच वाईन विक्रीसाठी ठेवली जाईल असं नाही.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड करत असतात त्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि राज्य शासनालाही त्यातून महसूल मिळेल असं वळसे पाटील म्हणाले.