PM Narendra Modi Visit Mumbai Highlights: पंतप्रधान मोदी यांचा मेट्रोने प्रवास, मेट्रोत विद्यार्थ्यांशी संवाद

Thu, 19 Jan 2023-8:14 pm,

Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ.. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण करण्यात आलं (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. (Mumbai News in marathi)

PM Narendra Modi Mumbai Visit Highlights  : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

Latest Updates

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित आहेत.

  • मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाही, केवळ तो पैसा योग्य ठिकाणी उपयोगात आला पाहिजे, तो भ्रष्टाचारात अडकला किंवा बँकेत पडून राहिला तर मुंबईकारांचं भविष्य उज्ज्वल कसं होणार, मुंबईतल्या रस्ते विकासासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध

    विकासाआड कधीही राजनिती आणू देत नाही. विकास हीच भाजपची प्राथमिकता आहे. 

  • शिंदे-फडणवीस यांच्या जोडीने विकासाला गती दिली, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार, शहरांच्या समस्या सोडण्यावर भर देणार,  येत्या काही दिवसात मुंबईचा कायापालट होईल - मोदी

  • जगभराती अर्थव्यवस्था डळमळीत झालीय, पण भारतात मात्र याचा कोणताही परिणाम नाही, 8 वर्षात असंवेदनशील दृष्टीकोन बदलतोय, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारने विकासाला गती दिली.

  • आजची विकासकामं मुंबईला उत्तम करण्यासाठी आहेत. भारतातील आशावद जगभरात दिसतोय. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोटी स्वप्न पाहाण्याचं धाडस, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर देशात बनतंय. - पीएम मोदी

  • पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा सुरुवात मराठीतून केली. मोदींच्या हस्ते  40 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण 

  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो 2अ, मेट्रो 7 चं लोकार्पण

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 दवाखान्यांचं लोकार्पण, बाळासाहेब  ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पण

    मोदींच्या हस्ते 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं लोकार्पण

  • मुख्यमंत्री शिंदे...

    - फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मेट्रोचं काम जलद गतीने सुरू झाले. पण, मधल्या काळात काय झालं ते आपल्याला माहित आहेच... 'आपला दवाखाना' आज 20 ठिकाणी सुरू होईल ते मार्चपर्यत 100 'आपला दवाखाना' जनतेसाठी सुरू होतील... - डांबरीकरण नावाखाली काळ पांढरे करणारे दुकाण बंद होणार आहे. - काहीची पोटदुखी -मळमळ वाढली...आता सहा महिन्यात आपण विकास काम करतोय. पुढील दोन वर्षात अजून काम किती करू याची चिंता त्यांना आहे. ते टीका करत राहील पण आपण विकास काम करत राहू

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महाविकास आघाडी काळात विकास किती झाली याची माहिती तुम्हाला..ठप्प झालेले विकास कामे आता पुन्हा होत आहे. - पीएम मोदी यांच्या धाडसी नेत्यामुळे विकास कामं पुन्हा सुरू झाली. - पंतप्रधान मोदी यांना पाहिले की सकारात्मक ऊर्जा मिळते.मुंबईकरांचे विकास काम सुरु कायापालट होताना दिसेल. - काही लोकांची इच्छा होती पीएम यांच्या हस्ते कार्यक्रम होऊ नये, पण नियती समोर काही चालत नाही. - बाळसाहेब ठाकरे आणि मोदी यांचे स्नेहसंबंध,हिंदुत्त्व दोन्हीची भूमिका

     

  • 20-25 वर्ष मुंबई महापालिकेवर ज्यांनी राज्य केलं,  त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं, स्वत:ची घरं भरली, पण मुंबईकरांना कधी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही

  • काही लोकांनी गद्दारी केली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोदींसमोर उद्धव ठाकरेंना टोला. त्या बैठकीला मोदी देखील उपस्थित होते, असं म्हणत फडणवीसांचा भर सभेत गौप्यस्फोट!

  • काही जणांनी गद्दारी केल्याने सत्ता गेली होती, पण राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सत्ता आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान मोदींसमोर उद्धव ठाकरे यांना टोला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीत दाखल झाले असून इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे,  व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांचा सत्कार

  • पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

    पंतप्रधान मोदींचं मुंबईत आमगन झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदींचा ताफा बीकेसीच्या दिशेने रवाना झाला आहे.

  • बीकेसी मैदानात समर्थकांची गर्दी

    बीकेसीमधील मैदानावर पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी भाजपा आणि शिंदे गट समर्थकांची मोठी गर्दी. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाजपा आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

  • शिंदे-फडणवीस विमानतळाकडे रवाना

    PM Modi In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी विमानतळावर पोहोचणार आहेत. मोदींचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे.

  • PM Modi At BKC, Mumbai: पंतप्रधान मोदींची बीकेसीमध्ये सभा होणार आहे. मात्र पंतप्रधानांच्या स्वागताआधीच बीकेसीमधील स्वागत कमान कोसळली आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. बीकेसीमध्ये मागील आठवड्यापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे. मात्र ऐन कार्यक्रमाच्या आधीच ही दुर्घटना घडल्याने काही वेळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पण कोणीही जखमी झालं नसून ही कमान बाजूला करण्यात आली आहे.

  • Narendra Modi Mumbai Visit LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबईकडे निघाले आहेत. सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे.

  • हॉस्पिटल भूमिपूजनावरुन काँग्रेस - भाजपात श्रेयाची लढाई

    Narendra Modi Mumbai Visit : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील करण्यात येत आहे. त्यात भांडुप येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा भूमिपूजनाचा देखील समावेश आहे. परंतु सध्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन श्रेय वादाची लढाई सुरु झाली आहे. सप्टेंबरमध्ये काँग्रेस नगरसेविका उषा कोपरकर आणि सुरेश कोपरकर यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर या कामाला सुरुवात देखील झाली आहे मुंबई महानगरपालिकेच्या फंडातून हे काम केले जात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आम्ही केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी स्व हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला असून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी नेमके कोणी प्रयत्न केले याची कल्पना जनतेला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी दिली आहे. 

  •  ठाण्यातून 7500 कार्यकर्ते रवाना 

    Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ठाण्यातून साडेसात हजार कार्यकर्ते रवाना झालेत.शहराच्या विविध भागातून सभास्थानी म्हणजेच बिकेसी येथे जाण्यासाठी बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपरिक वेशात फेटे परिधान करुन शहराच्या विविध भागांतून कार्यकर्ते बिकेसीला रवाना होतायत. यात विशेष लक्ष वेधून घेतलंय ते ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील कोळी बांधवांनी. येथील कोळी बांधव आपली पारंपरिक कोळी वेषभूषा परिधान करून कोळी गाण्यांवर थिरकत मोदींच्या सभेला रवाना झालेत. ठाण्याचे आमदार संजय केळकरही त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.

  • नवी मुंबईमधून शिंदे गटाच्या 120 बस रवाना

    Narendra Modi Mumbai Visit : मोदी यांची मुंबईतील बिकेसी येथे सभा होणार आहे. यासाठी नवी मुंबईमधून मोठ्या प्रमाणात बस मुंबई कडे रवाना  झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून नवी मुंबईमधून 120 बस  रवाना करण्यात आल्या आहेत  तर भाजप कडून 95 बस रवाना करण्यात आल्या आहेत.  ऐरोली टोल नाका येथून बिकेसी येथे रवाना झाल्या आहेत.

  •  शिंदे गटाचे कार्यकर्ते सभेसाठी रवाना

    Narendra Modi Mumbai visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ठाण्यातील भाजप सोबतच बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. ठाण्यातून 20 पेक्षा जास्त एसटी बसेसमधून शेकडो कार्यकर्ते मोदींच्या सभेसाठी रवाना झालेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या किसन नगर प्रभागातूनही शिंदे गटाचे कार्यकर्ते सभेसाठी रवाना झालेत. 

  • मोदी यांचा हा दौरा राजकीय हेतूने प्रेरीत - दानवे

    Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा हा दौरा राजकीय हेतूने प्रेरीत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आमची सत्ता असताना या कामांची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. केवळ उद्धाटन, भूमीपूजन करुन ते या कामांचे श्रेय घेत आहेत. मोदींच्या कार्यक्रमात 'बेगाने शादी मै अब्दुल्ला दिवाना' असं शिंदे गटाचे झाले आहे. ते केवळ नाचायला जात आहेत. महाविकास आघाडीत कुठलाही सावळागोंधळ नाही, असे ते म्हणाले.

  • गुंदवली मेट्रो स्थानक फुलांनी सजवले

    Narendra Modi in Mumbai :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मोदी मेट्रो 7 आणि 2  याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे अंधेरी येथील गुंदवली मेट्रो स्थानकात फुलांची आरस करण्यात आलेली आहे.

  • मोदी दौरा :  भाजप, शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन

    Narendra Modi Mumbai visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण - डोंबिवलीतील भाजप, शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन. एस महामंडळच्या शंभर गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. दोन हजार हून अधिक कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. बीकेसी येथे जाहीर होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे.सभेच्या निमित्ताने भाजप व शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे मुंबई ठाणे सह कल्याण डोंबिवलीमधून देखील तब्बल 100 हून अधिक बसेस सभेसाठी रवाना होणार आहेत.

  • पंतप्रधान मोदी यांचा नियोजित मुंबई दौरा कार्यक्रम

    Narendra Modi in Mumbai :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन 4 वाजून 14 मिनिटांनी मुंबईत होणार आहे. 4.15 वाजता मुंबईतील बीकेसी ग्राउंडकडे रवाना होणार आहेत. 7.20 वाजता मोदी मुंबई विमानतळावरुन प्रयाण करतील. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. 

    पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा

  • ... म्हणून मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडली

    Narendra Modi in Mumbai :पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार, असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून  करण्यात आलाय. पार्कींगसाठी भिंत तोडण्यात आली आहे. मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.  

  • मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट 

    Narendra Modi in Mumbai :  मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करुन माहिती दिली आहे.  मी उद्या मुंबईत असेन. 38 हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे.

  • खासदार संजय राऊत यांनी डिवचलं

    Narendra Modi Mumbai Visit: मुंबई दौऱ्यावर येणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी डिवचलं आहे. सीमावर्ती भागातल्या मराठी बांधवांवर अत्याचार करु नका, ही सूचना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना करा. त्याची महाराष्ट्रात घोषणा करा असं आवाहनही राऊतांनी केले आहे. मुंबईत येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचा दौरा करणार आहेत. सीमावादावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद आधीच पेटलाय.. त्यात राऊतांनी असं आवाहन करत आणखीन डिवचलंय... शिवसेनेच्या काळात मुंबई महापालिकेने जी कामं केली त्याचंच उद्घाटन मोदी करणार असल्याचा पुनरुच्चारही राऊतांनी केलाय.

  • मोदी यांची मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा, ...पण

    Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींची  (Narendra Modi) आज मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच चिंता वाढवणारी बातमी. कारण बीकेसीतली हवेची गुणवत्ता सर्वात वाईट असल्याचं समोर आलंय. बीकेसीमध्ये हवेची गुणवत्ता 343 तर मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता 316 इतकी नोंदवण्यात आलीय. वायू प्रदुषणाची नोंद करणा-या सफर संस्थेच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीय. मुंबईतल्या गाड्यांचं प्रदुषण, उडणारी धुळ, इमारतींची बांधकाम याचा परिणाम हवेवर होतोय. तर धुळ, धुके आणि धूर यांच्या मिश्रणानं तयार होणारं धुरकंही मुंबईवर पसरलंय. वायूप्रदुषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर्सनीही केले आहे. 

  • मोदी आणि बाळासाहेबांच्या फोटोचे बॅनर्स 

    Narendra Modi in Mumbai : आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर अज्ञाताने मोदी आणि बाळासाहेबांच्या फोटोचे बॅनर्स लावले आहेत. या फोटोत मोदी बाळासाहेबांपुढे मान झुकून नमस्कार करताना दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील गिरगाव, चर्नी रोड परिसरात  ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे फोटो लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल

    Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

    Narendra Modi यांच्या मुंबई दौऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्त, 'इतके' कर्मचारी तैनात

    PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी?

    Mumbai Metro : PM मोदी मेट्रोसह मुंबईतील 'इतक्या' कोटींच्या खर्चाच्या कामांचे करणार उद्घाटन

  • मुंबईत तब्बल 4500 पोलीस तैनात

    Narendra Modi in Mumbai : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. मोदी (Narendra Modi Mumbai Visit) यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत दौऱ्यात मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा (mumbai police) फौजफाटा तैनात असणार आहे. संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटीचे आरक्षण

    Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आलंय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस सुटणारेय. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसचं मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे. 

  • मुंबईत वाहतूक व्यवस्थेत असा बदल

    1) पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    2) संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

    3) खेरवाडी शासकीय वसाहत मनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मिकी नगर येथून यू टर्न घेऊन शासकीय वसाहत मार्ग कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढेवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

    4) तसेच सूर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून सीएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसमुखा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी मार्गस्थ होती.

  • Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. (Mumbai News in Marathi)  या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीवर सभा होणार आहे. या सभेत मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता आहे.

  • PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

    पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर संध्याकाळी भव्य सभाही आयोजित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचं राज आहे. यंदा मात्र मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तेव्हा मोदींच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचाच नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link