UP Election Results 2022 Live updates | भाजपा 271, सपा 123 जागा, निकालाचे LIVE UPDATE
UP Election Results 2022 Live updates : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा
मुंबई : उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला... यूपीत पुन्हा योगीराज? की अखिलेशसिंह बाजी मारणार? यासंबधीच्या सर्व ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक रिफ्रेश करा
Latest Updates
मतमोजणी केंद्रावर सपाच्या उमेदवाराचं धरणं
सीतापूरच्या हरगाव विधानसभेत सपा उमेदवार रामहेत भारती यांनी मतमोजणी केंद्राबाहेर धरणं धरत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. हरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश राही आघाडीवर आहेत.अयोध्येत भाजप चार जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एकूण 5 जागांपैकी भाजप चार जागांवर आघाडीवर आहे, तर सपा एका जागेवर आघाडीवर आहे. अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातून सपा उमेदवार अभय सिंह 2600 मतांनी आघाडीवर असून भाजपच्या उमेदवार आरती तिवारी पिछाडीवर आहेत.उत्तर प्रदेशमध्ये शिवेसेनेचं काय झालं?
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: युपीत जाऊन प्रचार केला होता. पण शिवसेनेला अद्याप खातंही खोलता आलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवारांना 0.02 टक्के म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं पडली आहेत.अखिलेश सपा कार्यालयात पोहचले
उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू असताना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनऊ येथील पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. 403 पैकी 389 जागांवर ट्रेंड आले आहेत आणि भाजप 270 जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 103 जागांवर आघाडीवर आहे.सीएम योगी 8363 मतांनी आघाडीवर आहेत
गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन टप्प्यांनंतर भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ आघाडीवर असून त्यांना 10888 मते मिळाली आहेत, तर सपा उमेदवार सुभवती शुक्ला यांना 2525 मते, सीएम योगी 8363 मतांनी आघाडीवर आहेत.स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर कुशीनगरच्या फाजिलनगर विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार सुरेंद्र कुशवाह 4500 मतांनी आघाडीवर आहेत, तर सपा उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत.
यूपीमध्ये भाजप 235 जागांवर पुढे
उत्तर प्रदेशमध्ये 403 पैकी 344 जागांवर कल दिसून आला असून भारतीय जनता पक्षाने (BJP) 235 जागांवर आघाडी मिळवली आहे. समाजवादी पक्ष 100 जागांवर, बसपा 5 जागांवर आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.जसवंतनगर मतदारसंघातून शिवपाल यादव मागे
जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार शिवपाल सिंह यादव निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पिछाडीवर आहेत.यूपी भाजप कार्यालयात जल्लोष
उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. भाजप 230 जागांवर आघाडीवर आहे, तर सपा 100 जागांवर आघाडीवर आहे.वाराणसीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. शहर दक्षिणमधून भाजपचे नीळकंठ तिवारी, शहर उत्तरमधून रवींद्र जैस्वाल पुढे, कॅन्टमधून सौरभ श्रीवास्तव पुढे, सेवापुरीतून सुरेंद्र पटेल पुढे, शिवपूर विधानसभेतून अरविंद राजभर पुढे, त्रिभुवन राम अजगरामधून, अभय पटेल पुढे आहेत.
रायबरेलीतून आदिती सिंह आघाडीवर
उत्तर प्रदेशातील रायबरेली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या अदिती सिंह आघाडीवर आहेत.उत्तर प्रदेशात 311 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 250 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भजापने 200 चा आकडा पार केला आहे. भाजप 205 जागांवर आघाडीवर असून सपा 95 जागांवर आघाडीवर आहे. तर बसपा 7 आणि काँग्रेस 4 जागेवर आघाडीवर आहे.देवरियातून भाजप आघाडीवर
देवरिया सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सलभमणि त्रिपाठी आघाडीवर आहेत.उत्तर प्रदेशात 250 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 250 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजप आणि सपात जोरदार चुरस रंगली आहे. भाजपने 152 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सपा 93 जागांवर मुसंडी मारली आहे, तर बसपा 6 आणि काँग्रेस 3 जागेवर आघाडीवर आहे.मैनपुरी विधानसभेतून भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी विधानसभा जागेवर भाजपा आघाडीवर आहे, वाराणसीच्या कैंटधमधून सौरभ श्रीवास्तव पिछाडीवरमतमोजणीदरम्यान अखिलेश यादव यांचे ट्विट
मतमोजणी सुरू असताना सपाच्या अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे, 'निकाल अजून बाकी आहे, आता धैर्याची वेळ आहे, मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 'लोकशाहीचे सैनिक' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततात!'उत्तर प्रदेशात 200 जागांचे ट्रेंड
उत्तर प्रदेशात 403 पैकी 203 जागांचे ट्रेंड समोर आले असून भाजपने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सपा 75 जागांवर आघाडीवर आहे, तर बसपा 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.कानपूर देहाट सिकंदरातून बसपा आघाडीवर
कानपूर देहाटच्या सिकंदरा विधानसभेतून बसपाचे उमेदवार लालजी शुक्ला आघाडीवर असून भाजपचे अजित पाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जालौनमध्ये मतपत्रिकांच्या मतमोजणीत तीनही जागांवर सपा पुढे आहे.
तर मधौगढ काल्पी ओराईमध्येही सपा आघाडीवर आहे.
कानपूरमधील मतपत्रिकांच्या मतमोजणीत बिथूरमधून भाजपचे अभिजित सिंग सांगा आघाडीवर आहेत.
गाझियाबादमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत शहर विधानसभा आणि साहिबााबाद विधानसभेच्या जागेवरून भाजप आघाडीवर आहे.भाजपची जोरदार मुसंडी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपची जोरदार मुसंडी, 125 जागांवर आघाडीवर, समाजवादी पक्ष 75 जागांवर आघाडीवर. आतापर्यंत 403 जागांपैकी 203 जागांचे निकालगोरखपूर सदरमधून योगी आदित्यनाथ आघाडीवर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.भाजप 100 जागवार तर सपा 67 जगावर आघाडीवर आहे
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाकडे 100 जागवार आघाडी, तर समाजवादी पक्षाची बाजू 58 जागवार आघाडीवर आली आहे. त्याचवेळी बसपा 2 आणि कॉंग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहेत.भाजप 100 जागांवर आघाडीवर आहे
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागांसाठी मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने तब्बल 50 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्ष 60 जागांवर आघाडीवर आहे.मतमोजणी केंद्रावर एसपींनी वकील तैनात केले
समाजवादी पक्षाने मतमोजणी केंद्रावर वकील तैनात केले असून प्रत्येक विधानसभेच्या जागेसाठी 2 वकील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वेळी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सपाने वकिलांना कामाला लावले आहे.करहलमधून अखिलेश यादव पुढे
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह मागे
नोएडामधून भाजपचे उमेदवार पंकज सिंह आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.