मुंबई : बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि अखेर निकालाची तारीख जाहीर झाली. आज (17 जून) इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं. (10 th SSC Result 2022 declare website time cut off)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022  या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. 


विद्यार्थी आणि पालक निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. शालेय जीवनाचा उंबरठा ओलांडून नव्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आता हे विद्यार्थी निकालानंतर त्यांचा नवा प्रवास सुरु करणार आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. 


कुठे पाहता येणार निकाल? 
http://mahresult.nic.in 
http://sscresult.mkcl.org 
https://ssc.mahresults.org.in 


या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 


किती विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा?
यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी मुलांची संख्या 8,89,506 आणि मुलींची संख्या 7,49,458 इतकी आहे. 


ऑनलाईन निकाला जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.