मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता गेल्या काही दिवासांपासून देशव्याची लॉकडाऊऩ लागू करण्यात आला. लॉकडाऊनच्या याच काळात कष्टकरी श्रमिकांच्या एकमा मोठ्या वर्गाला कुटुंबापासून, मुळ गावापासून दूर राहावं लागलं होतं. ज्यानंतर श्रमिकांची ही अवस्था पाहता त्यांना मुळ गाली पोहोवण्यासाठी एसटी बस तारणहार ठरल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी मागील सात दिवसांमध्ये एसटीच्या तब्बल १० हजार बस राज्याच्या विविध भागातून रस्त्यांवर उतरल्या आहेत. शुक्रवारी अखेर १ लाख ३४ हजार ५३८ श्रमिकांनी या बस सेवेचा लाभ घेतल्याची माहिती समोर येत आहे.


शुक्रवारी म्हणजेच १५ मे या दिवसभरात १०३४ एसटी बसेस मधून २२ हजार ६१७ श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचवण्यात आलं. एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत एसटीच्या चालकांनी लक्षवेधी भूमिका निभावली आहे. 


 


वाचा : महाराष्ट्रात कसा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती 


 


राज्याच्या विविध भागांतून श्रमिकांना घेऊन, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करत सुरक्षितपणे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी या चालकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अर्थात चालकांच्या या कामगिरीला एसटीच्या इतर कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची मिळालेली मोलाची साथही नाकारता येणार नाही.