10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!
Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साउंड सिस्टिमवर जोरजोरात गाणे का वाजवता असं विचारल्याचा राग आल्याने एकाने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीयूष भीमाशंकर जाधव असं मयत व्यक्तीचे नाव आहे.
नाशिकच्या मुंबई नाका येथील सहवास नगरजवळील सार्वजनिक शौचालयानजीक शुक्रवारी रात्री रिक्षा उभी करून त्यामध्ये साउंड सिस्टीमवर जोरजोराने गाणे वाजवत टोळके नाचत होते. यावेळी एका युवकाने त्यांना येथे नाचू नका, असे म्हणत हटकले. त्याचाच राग मनात धरुन याचे निमित्त करत टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून शस्त्राने हल्ला चढविला.
आरोपींचा वर्मी घाव बसल्याने पीयूष भीमाशंकर जाधव याचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांनी याप्रकरणी दहा संशयित हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, नऊ हल्लेखोरांना अटक केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.१९) रात्री ११ वाजेच्या सुमारास कालिकामाता मंदिरामागील सहवासनगर परिसरातील एका शौचालयासमोरच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून संशयित आरोपी प्रवीण पुंडलिक निंबारे (१९), रोशन भगवान माने (२२), अजय संतोष शिंदे (१९), देव संगीता वाघमारे (१९), आदित्य राजू महाले (२०) यांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तसेच साहिल कृष्णा वांगडे (१८), नितीन शंकर दळवी (१८), नीलेश रवी नायर (२६), ऋषिकेश संतोष जोर्वेकर (२०) यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व हल्लेखोर सहवासनगर भागातीलच रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
17 लाखांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांची अटक
नाशिकच्या पेठ रोड परिसरात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला गुन्हे शाखा 1 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 14 लाखाची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी पेठ रोड परिसरात व्यापारी असणारे दिलीप छाजेड यांची दुचाकी अडवत 17 लाखांची चोरी केली होती. त्यानंतर छाजेड यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन गाठत चोरीची माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच गुन्हे शाखा शाखेच्या पथकाने आपली चक्र फिरवत गुन्हेगारांचा तपास केला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली चोरी करणारे संशयित पेट्रोलच्या शनी मंदिर परिसरात आहे. त्यावर पोलिसांनी सापळा रचून फुलेनगर परिसरात ही कारवाई केली. संदेश पगारे उर्फ काळ्या याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आणखीन चार नावाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पुन्हा पेट्रोल परिसरात सापळा रचून सागर पगारे, माऊ उर्फ वैभव गांगुर्डे, अतुल सय्यद, असलम सय्यद यांना अटक केली. यांच्याकडून दोन दुचाकीसह 13 लाख 94 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.