धुळे : धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींची नोव्हेंबरमध्ये तर २५ ग्रामपंचायतींची डिसेंबर महिन्यात मुदत संपत आहे. त्यात धुळे तालुक्यातील ३५, साक्री तालुक्यातील ३२, शिंदखेडा तालुक्यातील २३, तर शिरपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 


या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी वेगात तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व १०८ ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळी घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींची निवडणूक याच कालावधीत होणार आहे.