जळगाव : जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांच्या हातात व्हॉट्स ऍपवर मराठीचा पेपर दिसून आला. केंद्र प्रमुखांनी याप्रकरणी हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केंद्र प्रमुखांनी केराची टोपली दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेचं नाव मोठं करण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर या केंद्रावर काही शिक्षकांचे पाल्य दहावीची परीक्षा देत आहेत. त्या विद्यार्थ्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याचं इथं दिसून येत आहे.