यवतमाळ : यवतमाळ शहर आणखी एका खूनानं हादरलं. दीड महिन्यात शहरात झालेला हा अकरावा खून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघापूर परिसरातल्या बोदड शिवारातल्या चिंतामणी नगरमधली ही घटना आहे. अनिल उर्फ लहान्या भीमराव गजभिये असं हत्या झालेल्याचं नाव आहे. 


मध्यरात्रीच्या सुमाराला निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला. खुनामागचं कारण अजून स्पष्ट झालं नसून, पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.