अनिरुद्ध दवाळे, अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूनक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे ३५ सेंटी मीटर नी आज पहाटे उघडण्यात आले. या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील दमदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आले आहे. पश्चिम विदर्भात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणात मध्यप्रदेशातील पावसाचे पाणी व धरण क्षेत्रात होत असलेला दरदार पाऊस यामूळे अप्पर वर्धा धरणाचा काल सायंकाळी १ दरवाजा उघडण्यात आला होता. परंतु मध्यरात्री धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलाश्याची पातळी ही ९५.१६% इतकी झाल्याने पुन्हा १० दरवाजे उघडण्याचा निर्णय हा धरण प्रशासाने घेतला. 


मागील वर्षीच्या उन्हाळ्यात अखेरीस या धरणाचा जलसाठा हा ११% पर्यत येऊन पोहचला होता.परन्तु मागील वर्षी झालेल्या दमदार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.यंदा सुद्धा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरला आहे. त्यामुळे आता अमरावती शहर, वरुड, मोर्शी, आष्टी, सह आदी गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. रब्बी हंगामातील शेती साठी सुद्धा या धरणांतील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो.


वर्धा धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे रात्री उघडले


अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील निम्मं वर्धा प्रकल्पाचे ३३ पैकी १५ दरवाजे रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडण्यात आले आहे. या १५ दरवाज्या मधून १५६ क्कुमेंक पाणी हे वर्धा नदी जलपत्रात सोडन्यात आलव आहे.त्यामुळे नदी काठारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


दरम्यान निम्मं वर्धा जल प्रकल्पात सध्या ७५% इतका जलसाठा आहे. मागील दोन दिवसांपासून निम्मं वर्धा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यातच मध्यप्रदेश मध्ये सुद्धा दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे असलेले अप्पर वर्धा धरण हे ९५% भरले आहे. त्यामुळे याही धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे ते पाणी निम्मं वर्धा प्रकल्पात येत असल्याने ३३ पैकी १५ दरवाजे हे उघडन्यात आले आहे.