जळगांव : राज्यात राज ठाकरे यांच्या मनसेला एकावर एक धक्के बसत आहेत. जळगाव महापालिकेतील १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचे नेते सुरेश जैन हे आहेत असे सांगत महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे १२ नगरसेवक  खान्देश विकास आघाडीतर्फे मनपाची निवडणूक लढविणार आहेत. सुरेश जैन  यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून पुढील निवडणूक लढविणार आहोत, असे महापौर कोल्हे यांनी जाहीर केलेय.


जळगाव महापलिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. १ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. आज मनसेचे ललित कोल्हे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीतर्फे लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेला जळगावात जोरदार धक्का बसलाय.