यवतमाळ : यवतमाळमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय. केंद्रीय विद्यालयात सहावीत शिकणारा अभिजीत टेकाम हा विद्यार्थी शिकवणीला गेला होता. मात्र, वेळ होऊनही तो घरी परतला नसल्यानं अभिजीतच्या वडिलांनी शोध घेतल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर सूरज नगर परिसरात त्याची सायकल आढळली त्यामुळे पोलिसांनी आणखी शोध घेतला. सागवान जंगल परिसरात अभिजीतचा मृतदेहच आढळून आला. त्याचा चेहरा दगडानं ठेचलेल्या अवस्थेत होता. अभिजीतची हत्या कोणी आणि कशासाठी केली याबाबत पोलीस शोध घेतायत.