SSC-HSC Board Exam 2023 Update : आताची सर्वात मोठी बातमी, येत्या 21 फेब्रुवारी बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरु होणार आहे. पण त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. (12th and10th board exam 2023 Maharashtra ssc hsc exam important update 10th-12th exams will be postponed teaching staff strike latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी 13 फेब्रुवारीला मोर्चाही काढणार आहेत. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने दिलाय. शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संपामुळे मुंबई विद्यापीठातल्या परीक्षाही स्थगित करण्याची वेळ ओढावली होती... तेव्हा दहावी-बारावीच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय.


शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या काय आहेत?


शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरीत सुरु करा


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा वर्ष योजनेचा लाभ द्या


जुनी पेन्शन योजना लागू करा


अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी


अनुकंपा नियुक्तीवरीला मान्यता तात्काळ देण्यात यावी