जळगाव : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 40 वर्षीय व्यक्तीला सर्पदंश झाला आहे. त्यानंतर व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू या  व्यक्तीला पूर्वी सापाने 12 वेळा दंश केला असुन ही 13 वी वेळ आहे.  2017 मध्ये सात महिन्यात त्याला 10 वेळा सर्पदंश झाला होता. अशी माहिती कुटूंबियांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहिगाव ता. यावल येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) या व्यक्तीला पुन्हा सर्पदंश झाला. गणेश गावातील एका वस्तीत काम करीत असताना सार्वजनिक शौचालयाजवळ त्याला सापाने दंश केला.  गणेशला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 


गणेशला या पुर्वी एप्रिल 2017 ते ऑक्टोंबर 2017 सात महिन्याच्या काळात तब्बल 10 वेळा सर्पदंश झाला होता.  


गावात चर्चांना उधाण


गणेशला सतत सर्पदंश होत असल्याने, नागिन बदला तर नसेल घेत ना? अशा अंधश्रद्धेच्या चर्चा गावात सुरू झाल्या होत्या. मध्यंतरी हा प्रकार थांबला होता. परंतू गणेशला गेल्या डिसेंबरमध्ये सर्पदंश झाला. आणि आता पुन्हा बुधवारी सर्पदंश झाल्याने कुटूंबियांमध्ये पुन्हा भितीचं वातावरण आहे.