13 वर्षाच्या मुलीच पोट आलं पुढे, रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरही हादरले, मुंबईमधील धक्कादायक घटना!
मुलीला लागली होती वाईट सवय, घरी कोण नसताना करायची हे किळसवाणं कृत्य!
प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : लहानपणी प्रत्येकाला काहीना काही सवय असतात, काहीजण माती खातात तर काही तोंडात अंगठा चोखतात. मात्र वसईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 13 वर्षाच्या मुलीच्या पोटातून तब्बल 1 किलोचा केसाचा गोळा काढण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकार?
वसईत एका 13 वर्षीय तरुणीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून 1 किलो केसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. लहानपणापासून या मुलगी स्वतःचेच केस खायायची सवय लागली होती. अखेर पोटात त्रास होऊ लागल्याने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटात साचलेला केसाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. वसई परिसरात राहणाऱ्या या मुलीला लहानपणापासून केस खायायची सवय होती. कोणाचे लक्ष नसताना ही मुलगी स्वतःचेच केस उपटायची आणि केसाचा गोळा करून ती खात होती
वयाच्या 13 वर्षी मात्र तिला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. पोटात केसाचा गोळा तयार झाल्याने तिने काही खाल्ल्यास तिला उलट्या होतं होत्या, पोट फुगलेले वाटणे, शिवाय सतत पोटदुखीचाही त्रास होत असल्याने तिच्या कुटुंबियांनी वसईच्या डिसोजा हॉस्पिटलममध्ये जाऊन डॉक्टरांना हा प्रकार सांगितला.
डॉक्टर जोसेफ डीसोझा यांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी केली असता त्यात केसाचा गोळा तयार झाल्याचे समजले व त्यानंतर एक तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात जमा झालेला केसाचा गोळा बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर आहे.या प्रकारला ''''हेअर बॉल ट्यूमर'''' असं म्हटलं जातं. लहान मुलांना खेळताना काहीही तोंडात घालायची सवय असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर जोसेफ डिसोजा यांनी दिला आहे.