नाशिक : पावसानं नाशिक जिल्ह्यात यावेळी विक्रमी बरसात केल्यानं, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातली धरणं ८५ टक्के भरली आहेत. यापैकी १४ धरणं १०० टक्के भरली आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच काळात नाशिक जिल्ह्यातली केवळ दोनच धरणं १०० टक्के भरली होती. यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला असून, जायकवाडीला आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ६५ टीएमसी पाणी मिळाले आहे. 


परिणामी मराठवाड्याचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. यासोबतच मध्य वैतरणा आणि अप्पर वैतारणा धरणंही भरल्यानं मुंबईची तहान सुद्धा भागली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात परतीचा पाऊस होत असल्यानं, आणखी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरण पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.