Indapur  Crime News : उरणमध्ये राहणा-या 20 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीवर वार करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. हत्या करून तरूणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन लगतच्या झुडपामध्ये आढळून आला. उरणमधील यशश्री शिंदे हत्येप्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच इंदापूरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या शिपायाने एका शालेय विद्यार्थीनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीने विरोध केला म्हणून शिपायने तिला कीटकनाशक पाजले. उपचारा दरम्यान या 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेला बळी पडलेली विद्यार्थीनी ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेतील एक शिपाई तिच्यावर नजर ठेवून होता. शिपाई या मुलीचा पाठलाग करत थेट तिच्या घरापर्यंत पोहचला. तिच्या घरावरजवळच शिपायाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, विद्यार्थीनीने याला विरोध केला. प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली. दरम्यान अकलूज मधील खाजगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


उरणची घटना ताजी असताना आता इंदापूर तालुक्यात देखील थरकाप उडवणार प्रकार घडल्यानं मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नांव असून पोलिसांनी आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केला आणि याच वेळी रणजीत जाधव याने आपल्याला कीटकनाशक पाजलं अशी फिर्याद देखील पोलिसांनी दाखल केली आहे.